For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताला पहिल्याच दिवशी 5 पदके

06:42 AM Jul 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताला पहिल्याच दिवशी 5 पदके
Advertisement

वृत्तसंस्था, ओर्डोस (चीन)

Advertisement

येथे सुरू झालेल्या 23 वर्षांखालील वयोगटातील आशियाई अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने पहिल्याच दिवशी 1 सुवर्णपदकासह एकूण 5 पदकांची कमाई केली. या स्पर्धेत 4×400 मी. मिश्र रिले प्रकारामध्ये भारताच्या आस्तिक प्रधान, सांद्रा साबू, सेथु मिश्रा आणि श्रावणी सांगले यांनी 3 मिनिटे 18.64 सेकंदांचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले. त्याचप्रमाणे पुरूषांच्या थाळीफेक प्रकारात भारताच्या भरतप्रीत सिंगने 52.91 मी.ची नोंद करत कांस्यपदक घेतले. या क्रीडा प्रकारात चीनच्या जीझीनने 60.79 मी.ची नोंद करत सुवर्णपदक तर चीनच्या जियांगने 59.60 मी.ची नोंद करत रौप्यपदक मिळविले.

पुरूषांच्या 5 हजार मी. धावण्याच्या शर्यतीत भारताच्या शिवाजी मदप्पगौड्रने 14 मिनिटे 08.19 सेकंदांचा अवधी घेत रौप्य पदक तर विनोद सिंगने 14 मिनिटे 23.67 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक घेतले. जपानच्या सुझुकीने 14 मिनिटे 01.24 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले. महिलांच्या 3000 मी. स्टिपल चेस प्रकारात भारताच्या प्राची देवकरने कांस्यपदक मिळविताना 10 मिनिटे 32.69 सेकंदाचा अवधी घेतला. या क्रीडा प्रकारात चीनच्या यांगने सुवर्ण तर युझीनने कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेमध्ये भारताचा 53 सदस्यांचा संघ सहभागी झाला आहे. 23 वर्षांखालील वयोगटासाठी ही पहिलीच आशियाई स्पर्धा घेतली जात आहे.

Advertisement

Advertisement

.