For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचा बेल्जियमवर विजय

06:48 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताचा बेल्जियमवर विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ अँटवर्प (बेल्जियम)

Advertisement

भारताचा कनिष्ठ पुरुषांचा हॉकी संघ सध्या युरोपच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने यजमान बेल्जियमचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 अशा गोलफरकाने पराभव करुन आपल्या मोहिमेला शानदार प्रारंभ केला आहे.

युरोप दौऱ्यातील झालेल्या पहिल्या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. त्यानंतर पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने बेल्जियमचे आव्हान 4-2 असे संपुष्टात आणले. या सामन्यात सुरुवातीला पेनल्टी स्ट्रोकवर तिसऱ्याच मिनिटाला शारदानंद तिवारीने भारताचे खाते उघडले. त्यानंतर 27 व्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि तिवारीने या संधीचा फायदा घेत भारताची आघाडी 2-0 अशी वाढवली. सामन्यातील तिसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत बेल्जियमचे खाते पेनल्टी कॉर्नरवर उघडले गेले. सामन्याच्या शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत बेल्जियमला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्यांनी गोल नोंदवून भारताशी 2-2 अशी बरोबरी केली होती. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतातर्फे गुरुज्योत सिंग, सौरभ कुशावाह, दिलराज सिंग आणि मनमित सिंग यांनी गोल केले. तर भारताचा गोलरक्षक प्रिन्स दिपसिंगने बेल्जियमचे पेनल्टी शूटआऊटमधील दोन फटके अडविल्याने भारताने हा सामना 4-2 अशा फरकाने जिंकला. या दौऱ्यातील भारताचा दुसरा सामना बुधवारी बेल्जियम बरोबर होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.