महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतचं विश्वचषक जिंकणार :कोल्हापूरकरांची राष्ट्रप्रेमी भावना

02:36 PM Nov 19, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

कोल्हापूरकर आठवडयात दुसऱ्यांदा दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज : इंडियाचे टीम कॉम्बिनेशन फरफेक्ट, ऑस्टेलिया संघालाही हलके समजूनचालणार नाही

Advertisement

संग्राम काटकर/कोल्हापूर

Advertisement

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची मेगा फायनल रविवार १९ रोजी भारत व ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. भारताचा कप्तान रोहित शर्मा की ऑस्ट्रेलियाचा कप्तान पॅट कमिन्स बाजी मारणार याची उत्सुकता साऱ्या क्रिकेट विश्वाला लागली आहे. फुटबॉलवेड्या कोल्हापुरातही गेली महिनामर क्रिकेटज्वर निर्माण झाला आहे. विश्वचषक स्पर्धेवर एकतर्फी पकड़ घेतलेला भारतच विश्वचषक जिंकणार अशी राष्ट्रप्रेमी भावना व्यक्त करत कोल्हापुरातील आजी-माजी क्रिकेटपटू प्रशिक्षक व क्रिकेटप्रेमी दुसऱ्यांदा दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज आहेत. भारतीय संघाचे टीम कॉम्बिनेशन फरफेक्ट आहे. हे कॉम्बिनेशनच ऑस्ट्रेलियन संघाला भारी पडेल, असे सर्वजण बोलून दाखवताहेत. ऑस्ट्रेलिया संघाला पसंती नसली हा संघ संघर्ष करत फायनलमध्ये आला आहे. त्यामुळे या संघाला हलके समजू नये, असेही सर्वजण सांगताहेत. त्यामुळे फायनल सामना जिंकून कोण विश्वचषक उंचावरणार हे आजची रात्रच सांगणार आहे.भारतीय संघाचा कन्सिसटन्सी फरफॉर्मन्स तुफान माजवले.

भारतीय संघाने साखळी फेरीतील दहाही सामने जिंकून विश्वचषक जेतेपदासाठीची दावेदारी सिद्ध केली आहे. जोमात असलेला कर्णधार रोहित शर्मा, विराट के.एल.राहूल, शुभमन गिली, श्रेयस अय्यर, गोलंदाज बुमराह, शामी, जडेजाने कन्सिसटन्सी परफॉर्मेन्स करत तुफान माजवले आहे. हेच तुफान अंतिम सामन्यात घोंघावणार आहे. भारतीय संघ बलाढ्य तरीही ऑस्ट्रेलिया संघाला कमी लेखू नये. हा संघ टारगेट ऑरोएंडेट खेळतो. त्यामुळे भारताला सावधगिरीनेच खेळावे लागेल.

'भारतीय संघाचे टीम कॉम्बिनेशन फरफेक्ट...

ऋतुजा देशमुख (महिला रणजी खेळाडू)

भारतीय संघ जिंकण्याबरोबरच सर्वोत्तम कामगिरी करण्याला प्राधान्य देत आहे. संघाचे टीम कॉम्बिनेशनही चांगले आहे. बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डींग साईड एकदम स्ट्रॉग आहे म्हणूनच भारतीय संघ फायनल मध्ये आला आहे. आता फायनलमध्ये भारतीय खेळाडू स्ट्राँगफुली खेळले तर त्यांना रोखताच येणार नाही, ऑस्टेलियाला साखळी सामने जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. यातून संघाकडे जिंकण्याची धमक असल्याचे दिसून येत आहे असे असले भारतीय संघ ऑस्ट्रेलिया भारी पडणार यात शंकाच नाही

चंदाराणी कांबळे (राष्ट्रीय क्रिकेटपटू व एमपीएल क्यू संघ हेडकोच)
भारताचे पारडे 

भारतीय संघाचे पारडे ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या कितीतरी पटीने भारी आहे. त्यामुळे भारतच विश्वचषक जिंकणार हे उघड आहे. ऑस्ट्रेलियाला विराट, शुभमन गील, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर व जडेजा या सारख्या वादळी फलंदाजांचे आव्हान रोखणे कठीण जाईल. भारतीय संघालाही लक्ष्यपूर्वक गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर, मॅक्सवेल, शॉन मार्श, स्मियला लवकरच बाद करावे लागेल. कारण हे खेळाडू बींग इनिंग खेळणारे आहेत. त्यांना लवकर गुंडाळले तर भारताचे तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले जाईल.

विशांत मोरे (रणजीपटू व यष्टीरक्षक)

भारतीय संघाला टारगेट ओरिएंटेडच खेळावे लागेल

फायनलमध्ये खेळताना भारतीय संघालाही टारगेट ओरिएंटेड खेळ करताना ऑस्ट्रेलिया संघासमोर किमान साडेतीनशेहून अधिक धावांचे आव्हान ठेवावे लागेल. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केल्यास भारतीय गोलंदाजांना फिल्डींगनुसारच गोलंदाजी करावी तर लागेलच, शिवाय कमी धावांमध्ये संघाला तंबूत पाठवावें लागले. सध्या भारतीय संघाचे मनोधैर्य चांगले आहे. त्यामुळे फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही भारतीय संघ यश मिळवून विश्वचषकावर कब्जा करेल.

संजना वाघमोडे (खेळाडू : महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघ)

भारताचे ऑस्ट्रेलियावर प्रेशर असेल...

२००३ साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला वाईट पद्धतीने हरवले होते. मात्र यंदाच्या विश्चषकात उलटे होईल, अशी स्थिती आहे. साखळी फेरीतील सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला अगदी सहज हरवेल असा मोठा इशाराही दिला आहे. त्यामुळे भारतीय संघावर ऑस्ट्रेलिया संघाचे २००३ सालच्या विश्वचषकासारखे प्रेशर असणार नाही. उलट ऑस्ट्रेलिया संघालासमोर भारताच्या बलाढ्य खेळाडूंचे प्रेशर असणार आहे. भारतीय संघानेही दमदार खोळी करत भारतवासियांना आठवख्यात दुसऱ्यांदा दिवाळी साजरी करण्याची संधी द्यावी.
अनिल सांगावकर (प्रशिक्षक मालती पाटील क्रिकेट ॲकॅडमी)

Advertisement
Tags :
#worldcupcriketloversindiakolhapurtarunbharatwon
Next Article