For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताला लवकरच मिळणार 26 राफेल-एम

06:22 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताला लवकरच मिळणार 26 राफेल एम
Advertisement

लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी फ्रान्ससोबत वाटाघाटी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय संरक्षण दलांकडून सातत्याने स्वत:च्या शस्त्रास्त्रसाठ्यात भर घातली जात आहे. याचकरता पुन्हा एकदा भारत आणि फ्रान्स यांच्यात राफेल लढाऊ विमानावरून चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही देशांच्या सरकारांदरम्यान 26 राफेल सागरी लढाऊ विमानांच्या व्यवहारासंबंधी वाटाघाटी सुरू आहेत. यादरम्यान विमानांची किंमत आणि अन्य संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे.

Advertisement

यापूर्वी भारत आणि फ्रान्स यांच्यादरम्यान राफेलच्या खरेदीसाठी 30 मे रोजी बैठक होणार होती, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे ही बैठक जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत टाळण्यात आली होती. फ्रान्सचे एक शिष्टमंडळ सध्या दिल्लीत आहे. या शिष्टमंडळासोबत संरक्षण दल तसेच नौदलाचे अधिकारी चर्चा करत आहेत. दोन्ही देशांच्या चर्चेत भारताचे प्रतिनिधित्व संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अधिग्रहण महासंचालनालयाचे अधिकारी तसेच नौदलाचे अधिकारी करत आहेत.

50 हजार कोटीचा व्यवहार

26 राफेल सागरी लढाऊ विमानांच्या खरेदीकरता सुमारे 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येणार आहे. सध्या भारतीय वायुदलाच्या ताफ्यात 36 राफेल लढाऊ विमाने आहेत. तर राफेल सागरी लढाऊ विमानांचे संचालन आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकांवरून केले जाणार आहे. राफेल एम ताफ्यात सामील झाल्यावर भारतीय नौदलाच्या लढाऊ क्षमतेत प्रचंड वाढ होणार आहे. भारतीय नौदल राफेल-एमद्वारे जुन्या लढाऊ विमानांना ताफ्यातून निवृत्त करू शकणार आहे.

राफेल-एम खास का?

-राफेल मरीन फायटर जेटला सागरी क्षेत्रात हवाई हल्ल्यासाठी खासकरून तयार करण्यात आले आहे.

-राफेल एमला विमानवाहू युद्धनौकेवर लँडिंगच्या दृष्टीकोनातून डिझाइन करण्यात आले आहे.

- या विमानाचे विंग फोल्डेबल आहेत. वायुदलाला मिळालेल्या राफेल विमानाचे पंख वळू शकत नाहीत.

-राफेल-एम एका मिनिटात 18 हजार मीटरची उंची गाठू शकते. हे विमान पाकिस्तानकडील एफ-16 किंवा चीनच्या जे-20 पेक्षा सरस आहे.

-राफेल एम लढाऊ विमानाचा कॉम्बॅट रेडियस 3,700 किलोमीटर इतका अधिक आहे.

-वायुदलाकडील राफेलप्रमाणेच या विमानातही आकाशात इंधन भरण्याची क्षमता आहे.

Advertisement
Tags :

.