कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत जी-20 मध्ये वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहणार : मूडीजचा अंदाज

06:01 AM Nov 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

मूडीज रेटिंग्जने म्हटले आहे की भारत पुढील दोन वर्षांसाठी जी-20 देशांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील. मूडीजच्या मते, 2027 पर्यंत भारताचा जीडीपी दर सरासरी 6.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे.  उच्च अमेरिकन कर आणि जागतिक अनिश्चितता असूनही भारताची अर्थव्यवस्था मजबूत राहणार आहे.

Advertisement

 कर आकारणीचा परिणाम नाही

50 टक्के अमेरिकन कर आकारणी असूनही, भारतीय निर्यातदारांना नवीन बाजारपेठा यशस्वीरित्या सापडल्या आहेत. सप्टेंबरमध्ये भारताची एकूण निर्यात 6.75टक्क्यांनी वाढली, तर अमेरिकेला होणारी निर्यात 11.9 टक्क्यांनी  घटली.

‘ग्लोबल मॅक्रो आउटलुक 2026-27’ या अहवालात, मूडीजने म्हटले आहे की भारताच्या विकास दराला मजबूत पायाभूत सुविधा गुंतवणूक, देशांतर्गत ग्राहक मागणी आणि निर्यात विविधीकरणाचा आधार मिळेल.

जी-20 म्हणजे काय?

जी-20 जगातील 20 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचा एक अनौपचारिक गट आहे, जो जागतिक आर्थिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी स्थापण्यात आला.

1999 मध्ये त्याची स्थापना वित्तीय स्थिरता मंच म्हणून करण्यात आली होती, 2008 च्या जागतिक वित्तीय संकटानंतर, 2009 मध्ये नाव बदलून जी-20 शिखर परिषद असे ठेवण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article