भारत जी-20 मध्ये वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहणार : मूडीजचा अंदाज
नवी दिल्ली :
मूडीज रेटिंग्जने म्हटले आहे की भारत पुढील दोन वर्षांसाठी जी-20 देशांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील. मूडीजच्या मते, 2027 पर्यंत भारताचा जीडीपी दर सरासरी 6.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. उच्च अमेरिकन कर आणि जागतिक अनिश्चितता असूनही भारताची अर्थव्यवस्था मजबूत राहणार आहे.
कर आकारणीचा परिणाम नाही
50 टक्के अमेरिकन कर आकारणी असूनही, भारतीय निर्यातदारांना नवीन बाजारपेठा यशस्वीरित्या सापडल्या आहेत. सप्टेंबरमध्ये भारताची एकूण निर्यात 6.75टक्क्यांनी वाढली, तर अमेरिकेला होणारी निर्यात 11.9 टक्क्यांनी घटली.
‘ग्लोबल मॅक्रो आउटलुक 2026-27’ या अहवालात, मूडीजने म्हटले आहे की भारताच्या विकास दराला मजबूत पायाभूत सुविधा गुंतवणूक, देशांतर्गत ग्राहक मागणी आणि निर्यात विविधीकरणाचा आधार मिळेल.
जी-20 म्हणजे काय?
जी-20 जगातील 20 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचा एक अनौपचारिक गट आहे, जो जागतिक आर्थिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी स्थापण्यात आला.
1999 मध्ये त्याची स्थापना वित्तीय स्थिरता मंच म्हणून करण्यात आली होती, 2008 च्या जागतिक वित्तीय संकटानंतर, 2009 मध्ये नाव बदलून जी-20 शिखर परिषद असे ठेवण्यात आले.