कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताला मिळणार एस-400 ची चौथी स्क्वाड्रन

07:00 AM Feb 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रशियासोबत 5 स्क्वाड्रनसाठी करार : 3 यंत्रणा भारताला प्राप्त

Advertisement

वृत्तसंस्था/मॉस्को

Advertisement

भारताला एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणेची चौथी स्क्वाड्रन चालू वर्षाच्या अखेरपर्यंत प्राप्त होणार आहे. डिसेंबरपर्यंत एस-400 स्क्वाड्रन भारतात दाखल होणार आहे. तर पाचवी आणि अंतिम स्क्वाड्रन पुढील वर्षी मिळण्याची अपेक्षा आहे. भारत आणि रशिया यांच्यात 2018 मध्ये एस-400 च्या पाच स्क्वाड्रनसाठी 35 हजार कोटी रुपयांचा करार झाला होता. यातील 3 स्क्वाड्रन चीन अन् पाकिस्तान सीमेवर तैनात करण्यात आल्या असून 2 अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. एस-400 स्क्वाड्रनमध्ये 16 व्हीकल सामील असतात, ज्यात लाँचर, रडार, कंट्रोल सेंटर आणि सहाय्यक वाहन सामील आहे. ही यंत्रणा 600 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा माग काढू शकते आणि लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता 400 किलोमीटरपर्यंत आहे.

भारतीय वायुदलाने जुलै 2024 मध्ये एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणेसह युद्धसराव केला होता. यात एस-400 यंत्रणेने शत्रूच्या 80 टक्के हवाई यानांना नष्ट करण्याची कामगिरी सिद्ध केली होती. यादरम्यान उर्वरित हवाई यानांना मागे हटावे लागले होते. वायुदलाचा हा थिएटर लेव्हलचा युद्धसराव होता, ज्यात एस-400 हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणेची स्क्वाड्रन तैनात करण्यात आली होती. सरावात एस-400 ने स्वत:च्या टारगेटला लॉक करत सुमारे 80 टक्के लक्ष्यांचा अचूक वेध घेतला. सरावाचा उद्देश एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणेच्या क्षमतांची पडताळणी करणे होता.

एस-400 यंत्रणा

ही एक हवाई सुरक्षा यंत्रणा असून ती आकाशातून होणारे हल्ले रोखू शकते. शत्रू देशाची क्षेपणास्त्रs, ड्रोन, रॉकेट लाँचर आणि लढाऊ विमानांच्या हल्ल्यांना रोखण्यास ही यंत्रणा उपयुक्त आहे. रशियाच्या एलमाज सेंट्रल डिझाइन ब्युरोने  याची निर्मिती केली असून जगातील सर्वात आधुनिक हवाई सुरक्षा यंत्रणांमध्ये याची गणना होते.

एस-400 ची वैशिष्ट्ये...

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article