For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

Budget 2023 : भारत बाजरीचे जागतिक केंद्र बनवणार-निर्मला सीतारामन

02:01 PM Feb 01, 2023 IST | Abhijeet Khandekar
budget 2023   भारत बाजरीचे जागतिक केंद्र बनवणार निर्मला सीतारामन

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेट सादर केलं . या बजेटमध्ये सर्वांगिण विकास, सबका साथ, सबका विकास या तत्वाने पुढे जायचे आहे असे त्यांनी भाषणात सांगितले. या बजेटमध्ये दुर्बल शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचं ध्येय ठेवण्यात आल्याचेही स्पष्ट केलं. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करत देशातील शेतकऱ्यांसाठी सरकार डिजीटल प्लॅटर्फाम उभारणार असल्याचे सांगितले. शिवाय कृषीपूरक स्टार्टअप्सना विशेष मदत, कापसापासून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे प्रयत्न,डाळींसाठी हब तयार तसंच 'श्रीअन्ना'वर देखील विशेष लक्ष केंद्रीत केलं जाणार असल्याचे सांगितेल. भारत बाजरीचे जागतिक केंद्र बनेल यासाठी भारताला ग्लोबल हब बनवण्यासाठी हैदराबादला 'श्रीअन्न' मोठ रिसर्च सेंटर होणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

Advertisement

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा
देशातील शेतकऱ्यांसाठी डिजीटल प्लॅटर्फाम उभारणार.
कृषीपूरक स्टार्टअप्सना विशेष मदत करणार.
अन्नधान्यांच्या उत्पन्नावाढीसाठी कसून प्रयत्न करणार.
बाजरी पिकात शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे.
शेतकऱ्यांसाठी पोषण,अन्नसुरक्षा आणि नियोजनासाठी बाजरी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
श्रीअण्णा राडी, श्रीअण्णा बाजरी, श्रीअण्णा रामदाना, कुंगनी,कुट्टू या सर्वांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

सहकार मॉडेलला येत्या काळात प्राधान्य
ज्या सहकारी संस्था आहेत त्यांना टेक्निकली स्टॅांग होण्यासाठी मोठी योजना जाहीर करण्यात येणार आहे.
येत्या पाच वर्षाच्या काळात केंद्र सरकार छोट्या सहकारी संस्थांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देणार.
ज्यामुळे त्या-त्या भागातील कृषीपूरक उद्योगाला मदत होईल.
अन्न साठवण विकेंद्रीकरण योजना राबवणार.
कृषीपूरक स्टार्टअप्सना विषेष मदत करणार.
सहकारातून समृद्धी हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणार आहे.
याद्वारे 63000 कृषी सोसायट्या संगणकीकृत केल्या जाणार आहेत.

Advertisement

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
पुढील तीन वर्षांत १ कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन दिले जाईल.
10 हजार बायो इनपुट रिसर्च सेंटर्सची स्थापना करण्यात येणार आहे.त्यासाठी सूक्ष्म खतावर भर दिला जाणार आहे.
मिस्ट्री (मॅन ग्रोन प्लांटेशन) वर भर दिला जाईल.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.