For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताला आक्रमकता दाखवावीच लागेल!

06:17 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताला आक्रमकता दाखवावीच लागेल
Advertisement

अमेरिकेत विश्व कप होतोय हे आशियाई संघासाठी पडलेले एक प्रकारे कोडंच. प्रथमच ड्रॉप इन पिचचा अनुभव जवळपास दहा संघ घेणार. हे सर्व काही क्रिकेटसाठी नवं नवं. भारतीय संघाने या अगोदर टी-20 मध्ये दिमाखदारपणे 2007 साली विश्व कप उंचावला होता. त्यानंतर 2014 मध्ये अंतिम फेरीतील धडक. अन्यथा बाकीच्या स्पर्धेतील कामगिरी तशी सुमारच राहिली आहे.

Advertisement

भारताला या विश्व कप स्पर्धेत काही वेगळे करायचे असेल तर अचूक डावपेच आखावेच लागतील. सतरा वर्षे झाली अजून भारताने यशाची चव चाखली नाहीये. ती नाट्यापूर्ण घटना अमेरिकेत होणार का हाच प्रश्न भारतीयांना सतावतोय. 2022 मध्ये पाकला दणका दिल्यानंतर सुद्धा इंग्लंडविऊद्ध उपांत्य फेरीत शर्मनाक पराभव स्वीकारावा लागला होता, हे कोण विसरणार? आता 2024 मध्ये नेमकं काय होणार? तेही अमेरिकेमध्ये हा मोठा यक्षप्रश्न भारतीयांना पडलाय. 2013 मध्ये आपण शेवटचा कप उंचावला होता. त्यानंतर पूर्णत: सन्नाटाच राहिला. टी-20 विश्व कप जिंकायचा असेल तर फलंदाजीत आक्रमक सुऊवात ही करावीच लागेल. 2022 च्या विश्व कप स्पर्धेत केएल राहुलने दोन षटके निर्धाव खेळून काढली होती, हे आपण कसे विसरणार? तुम्हाला आयपीएलमधील ट्रेवीस हेडसारखी आक्रमकता दाखवावी लागेल. यासाठी रोहितबरोबर पंत किंवा कोहली सलामीला येणे गरजेचे आहे. आयपीएलमध्ये विराट बऱ्याच वेळा सलामीला खेळला आहे. 2022 च्या एशिया कपमध्ये अफगाणिस्तानविऊद्ध विराटने शतकही झळकवले.

त्याचप्रमाणे नवीन चेंडूवर गडी बाद करणे हे फार महत्त्वाचे आहे. कारण हा छोटा फॉरमॅट आहे. तुम्ही जर झटपट गडी बाद केलात तरच तुम्ही विजयाच्या समीप जाऊ शकता. दुसऱ्या बाजूला सूर्यकुमार व पंत हे टी-20 मध्ये बाप आहेत. या दोघांना स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. कारण हे सुऊवातीपासूनच आक्रमण करत जलद धावा करू शकतात, हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले. सरते शेवटी मंदगती माऱ्याला जलदगती माऱ्याने मदत करणे गरजेचे आहे. 2023 मध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला फळास आली होती, हे मात्र आपणास विसरून चालणार नाही. एकंदरीत काय तर चांगल्या फलंदाजीला अचूक गोलंदाजीचा परिस स्पर्श गरजेचा आहे. अन्यथा हाही कप आपल्यासाठी स्वप्नच ठरेलं एवढं मात्र खरं! असो  भारताला आक्रमक सुऊवात ही करावी लागेल. ग्रुपमधील सर्व सामने जिंकत दिमाखदारपणे आपल्याला सुपर एटमध्ये प्रवेश करायचा आहे. बघूया, नेमकं काय नाट्या घडतंय? भारत आयर्लंड सामन्याबद्दल आपण उद्या बोलूच.

Advertisement

Advertisement
Tags :

.