For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत - वेस्ट इंडिज सामन्याला ‘क्वॉर्टरफायनल’चे स्वरुप

06:57 AM Mar 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत   वेस्ट इंडिज सामन्याला ‘क्वॉर्टरफायनल’चे स्वरुप
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

टी-20 विश्वचषकात आज रविवारी भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होणार असून दोन्ही संघांचा पुढील फेरीतील प्रवेश पणाला लागलेला असल्याने या सामन्याला जणू उपांत्यपूर्व फेरीचे स्वरूप आले आहे. भारतीय फलंदाजी सध्या सावरलेली असली, तरी भारताच्या गोलंदाजीतील तडे अजून भरून निघालेले नाहीत. दक्षिण आफ्रिकेविऊद्ध वेस्ट इंडिजचा पराभव आणि झिम्बाब्वेविऊद्ध भारताचा दमदार विजय यामुळे सुपर एटमधील हा गट-1 चा सामना ‘करो या मरो’ स्वरूपाच्या लढतीत बदलला आहे, ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या सामन्यातील विजेत्याला 5 मार्च रोजी मुंबईत इंग्लंडविऊद्ध होणाऱ्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या लढतीत स्थान मिळेल.

झिम्बाब्वेविऊद्ध भारताच्या फलंदाजीचे पुनऊज्जीवन अगदी परिपूर्ण होते. संजू सॅमसन अव्वल स्थानावर परतून सर्व अव्वल सहा फलंदाजांनी एकत्रितपणे योगदान दिले. पण याचा अर्थ असा नाही की, ईडन गार्डन्सवर त्यांना चिंता नसतील. फिरकी गोलंदाज वऊण चक्रवर्ती योग्य टप्पा राखण्यात अपयशी ठरला आहे आणि खूप जास्त प्रयोग करणेही त्याच्या अंगलट आल्याचे दिसून येते. त्यामुळे संघ व्यवस्थापन चक्रवर्तीला पाठिंबा देत राहते की, डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संधी देऊन त्याला विश्रांती देते हे पाहावे लागेल. आणखी एक चिंता अष्टपैलू शिवम दुबेच्या गोलंदाजीची आहे. दुबेने झिम्बाब्वेविऊद्ध फक्त दोन षटकांत 46 धावा दिल्या, ज्यामध्ये 10 चेंडूंच्या षटकात चार वाईड आणि दोन नो-बॉल समाविष्ट होते. गंभीरला फलंदाजी करू शकणाऱ्या गोलंदाजांबद्दल आकर्षण आहे हे सर्वज्ञात आहे, परंतु ईडनच्या खेळपट्टीवर दुबेची मध्यमगती वेस्ट इंडिजसारख्या संघाविऊद्ध अंगलट येऊ शकते.

Advertisement

ईडनच्या खेळपट्टीवर थोडे गवत असल्याने बुमराह, अर्शदीप आणि पांड्या या वेगवान त्रिकुटास काही प्रमाणात मदत मिळू शकते. विशेषत: सध्या फिरकी मारा पूर्ण खात्री देत नसल्याने त्यांची एकत्रित 12 षटके निर्णायक ठरू शकतात. दुसरीकडे, वेस्ट इंडिजची रणनीती अर्ध्या डावापर्यंत स्थिर सुऊवात आणि त्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये निर्भय हल्ला अशी स्पष्ट आहे. त्याच्या जोरावर त्यांना सलग पाच विजय मिळाले आणि दक्षिण आफ्रिकेने त्यांची घोडदौड रोखली. तरीही 11 षटकांत 3 बाद 83 अशी घसरण झाल्यानंतर वेस्ट इंडिजने 9 व्या क्रमांकावर अआलेल्या रोमारियो शेफर्डच्या लढाऊ अर्धशतकामुळे 8 बाद 176 अशी मजल मारून खोली दाखवली. शिमरॉन हेटमायरचे तिसऱ्या क्रमांकावर येणे देखील मोठा सकारात्मक परिणाम करून गेले आहे. ईडनची खेळपट्टी कोरडी असल्याने विंडीज डावखुरा फिरकी गोलंदाज अकील होसेनला परत आणण्याचा विचार करू शकते.

संघ-भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वऊण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

वेस्ट इंडिज : शाई होप (कर्णधार), जॉन्सन चार्ल्स, शिमरॉन हेटमायर, ब्रँडन किंग, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, क्वेंटिन सॅमसन, रोस्टन चेस, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, मॅथ्यू फोर्ड, अकेल होसेन, शामर जोसेफ, गुडाकेश मोती आणि जेडन सिल्स.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.

Advertisement
Tags :

.