For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

भारत-दक्षिण कोरिया, जपान-मलेशिया आज उपांत्य लढती

06:39 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत दक्षिण कोरिया  जपान मलेशिया आज उपांत्य लढती
Advertisement

वृत्तसंस्था, मोहाली : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेला आणि पाच वेळा विजेता ठरलेला भारत, सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या फॉरवर्ड अभिषेकच्या दुखापतीमुळे चिंतेत आहे. मात्र, विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघात इतकी खोली (बेंच स्ट्रेंथ) आहे की, बुधवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा सामना करण्यासाठी ते पूर्णपणे सज्ज आहेत.

Advertisement

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता भारत, जालंधर येथे झालेल्या सहा संघांच्या स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण कोरियाचा 8-0 असा पराभव केला होता. बुधवारी होणाऱ्या सामन्यातही भारत पुन्हा एकदा दक्षिण कोरियावर वर्चस्व गाजवेल, अशी अपेक्षा आहे. साखळी फेरीत भारताने बांगलादेशचा 13-0, चीनचा 5-2, जपानचा 4-1 आणि दक्षिण कोरियाचा 8-0 असा धुव्वा उडवला होता. मात्र, जपानविरुद्धच्या सामन्याच्या अगदी आधी अभिषेकच्या घोट्याला झालेली दुखापत चिंतेचा विषय ठरली आहे. अभिषेकने केवळ गोलच केले नाहीत, तर संघासाठी संधी निर्माण करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी आतापर्यंतच्या स्पर्धेत अभिषेकच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेतली आहे. फुल्टन म्हणाले, ‘आम्हाला अजून खात्री नाही. आम्ही परिस्थिती स्पष्ट होण्याची वाट पाहत आहोत. अभिषेक जखमी आहे, त्यामुळे तो पुन्हा खेळू शकेल का, हे पाहावे लागेल. आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल, कारण आमच्याकडे खूप कमी वेळ आहे.’

अभिषेकच्या अनुपस्थितीत, आक्रमक फळीची जबाबदारी अनुभवी स्ट्रायकर मनदीप सिंग, सुखजीत सिंग आणि शिलानंद लाक्रा यांच्या खांद्यावर असेल. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदवल्यानंतर, त्यानंतरच्या सामन्यांत मनदीपचा फॉर्म काहीसा खालावलेला दिसला. जर अभिषेक उपलब्ध नसेल, तर आदित्य अर्जुन लालागे आणि अंगद बीर सिंग यांच्यासारख्या खेळाडूंना जबाबदारी उचलावी लागेल. मात्र, भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगला अभिषेकच्या उपलब्धतेबाबत आशा आहे. हरमनप्रीत म्हणाला, ठतो ठीक आहे, आम्ही त्याला दोन सामन्यांत विश्रांती दिली आहे, पण मला खात्री आहे की तो उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असेल.ठ

Advertisement

उपकर्णधार हार्दिक सिंगच्या नेतृत्वाखाली मिडफिल्ड विभाग उत्तम कामगिरी करत आहे. त्याला विवेक सागर प्रसाद आणि निलकांत शर्मा यांची साथ मिळत आहे; विशेष म्हणजे, निलकांत भारतीय जर्सी परिधान करून खेळत असलेली ही त्याची शेवटची स्पर्धा आहे. कर्णधार हरमनप्रीत सिंगही जबरदस्त फॉर्ममध्ये असून, नऊ गोलसह तो या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे  ज्यामध्ये आठ गोल पेनल्टी कॉर्नरद्वारे, तर एक गोल पेनल्टी स्ट्रोकद्वारे केला आहे. याशिवाय, जुगराज सिंग आणि अमित रोहिदास यांच्या साथीने हरमनप्रीतने भारतीय बचावात्मक फळीलाही अत्यंत संयमाने सांभाळले आहे. युवा फॉरवर्ड विष्णुकंत सिंगला या स्पर्धेत मिळालेल्या संधींचे त्याने सोने केले असून, तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत आहे. गरज पडल्यास तो मिडफिल्डमधील जबाबदारीही पेलण्यास सज्ज आहे.

विष्णुकंत म्हणाला, ठमी ब्रयाच काळापासून या संधीच्या शोधात होतो आणि त्यासाठी खूप मेहनत घेतली होती. जपानविरुद्ध केलेल्या गोलमुळे माझा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. गरज पडल्यास मी मिडफिल्डमध्येही खेळायला तयार आहे.ठ भारतीय गोलकीपर सूरज करकेरा आणि कृष्ण बहादूर पाठक यांची या स्पर्धेत फारशी कसोटी लागलेली नाही; त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाकडून तीव्र आक्रमण झाल्यास ते कशा प्रकारे सामना करतात, हे पाहणे रंजक ठरेल. दरम्यान, दुस्रया उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानचा सामना आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या मलेशियाशी होईल.

भारतीय संघ: गोलकीपर: सूरज करकेरा, कृष्ण बहादूर पाठक. बचावपटू: संजय, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंग, जरमनप्रीत सिंग, अमनदीप लाक्रा. मिड-फिल्डर: राजिंदर सिंग, आदित्य अर्जुन लालगे, नीलकांत शर्मा, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, अंगद बीर सिंग. फॉरवर्ड? शिलानंद लाक्रा, अभिषेक, सुखजीत सिंग, दिलप्रीत सिंग, मनदीप सिंग, विष्णुकांत सिंग.

सामन्यांच्या वेळा

उपांत्य फेरी 1: जपान वि मलेशिया 4:30 वा.

उपांत्य फेरी 2: भारत वि. दक्षिण कोरिया सायं. 7:00 वा.

Advertisement
Tags :

.