भारत बांगलादेशविरुद्ध ‘क्लीन स्वीप’साठी
वृत्तसंस्था/ हैदराबाद
भारताचा बांगलादेशविरुद्धचा तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना आज शनिवारी होणार असून त्याला निकालाच्या दृष्टीने महत्त्व नसले, तरी भारत यावेळी दुहेरी लक्ष्य समोर ठेवून मैदानात उतरेल. त्यापैकी एक लक्ष्य मालिकेत क्लीन स्वीप साधण्याचे आणि दुसरे लक्ष्य दुसऱ्या फळीतील खेळाडूंच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्याचे असेल. ग्वाल्हेर आणि नवी दिल्ली येथे विजय मिळवून भारताने मालिका आधीच 2-0 अशी जिंकली आहे.
गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखालील या भारतीय संघाने विजयाची भूक दाखवली आहे. त्यामुळे ते आज कोणतीही शिथिलता दाखवण्याची शक्यता नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या काही महत्त्वाच्या स्पर्धांपूर्वी भारत त्यांची मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील संघाची रचना जागेवर टाकण्याचा प्रयत्न करेल. त्यादृष्टीने दीर्घकालीन उद्दिष्टे लक्षात घेऊन आघाडीच्या खेळाडूंना सक्षम पर्याय शोधण्याची प्रक्रिया गंभीर व त्याच्या सहकाऱ्यांनी सुरू केली आहे. वेगवान गोलंदाज मयंक यादव असो किंवा फिरकीपटू वऊण चक्रवर्ती असो, गंभीरला त्यांच्याकडे बारकाईने पाहायचे आहे आणि पुढच्या कठोर आव्हानांच्या दृष्टीने त्यांच्या तयारीचे मूल्यांकन करायचे आहे.
या मालिकेत वरील खेळाडूंनी निराशा केलेली नाही. मयंकने ताशी 150 किलोमीटर वेगाने गोलंदाजी केलेली आहे, तर चक्रवर्तीने ग्वाल्हेर येथे तीन वर्षांतील भारतातर्फे पहिल्या सामन्यात तीन बळी घेऊन दाखविले. नितीशकुमार रे•ाr याच्या प्रवासावरही संघ व्यवस्थापनाची बारीक नजर असेल. दिल्लीतील टी-20 मध्ये त्याने 34 चेंडूंत 74 धावा फटकावल्या आणि दोन बळीही घेतले.
दसरीकडे, संजू सॅमसनला या मालिकेत डावाची सुऊवात करण्याची संधी दिली गेली आहे. पण केरळच्या या खेळाडूने आतापर्यंत दोन माफक खेळी केल्या आहेत -19 चेंडूंत 29 धावा आणि 7 चेंडूंत 10 धावा. संघातील दुसरा यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्मा याला संधी द्यायची नसेल, तर व्यवस्थापनाच्या नजरेत भरण्यासाठी सॅमसनला येथे काही तरी खास करावे लागेल. त्याचप्रमाणे अभिषेक शर्माकडूनही भरीव खेळीची अपेक्षा असेल. त्याने गेल्या दोन सामन्यांमध्ये 15 आणि 16 अशा धावा केल्या आहेत.
सलामीवीरांच्या या अपयशामुळे मधल्या फळीवर थोडा ताण पडला आहे. दुसऱ्या टी-20 लढतीत यजमानांची पॉवर प्लेमध्ये 3 बाद 41 अशी स्थिती झाली होती. पण मधल्या फळीने त्यांना नंतर बाहेर काढले. त्याशिवाय लेगस्पिनर रवी बिश्नोई आणि अष्टपैलू हर्षित राणा यासारख्या इतर काही योग्य खेळाडूंना संधी द्यायची की नाही हे संघाचा थिंक टँक ठरवेल. बांगलादेशच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास पाहुणे या दौऱ्यात आतापर्यंत त्यांना हुलकावणी दिलेल्या विजयाची चव चाखण्याचा प्रयत्न या सामन्यात करतील. त्यासाठी त्यांना सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतील. विशेषत: कर्णधार नजमुल हुसेन शांतो, लिटन दास आणि मुस्तफिजुर रहमान यांसारख्या वरिष्ठांकडून प्रभावी प्रयत्न व्हावे लागतील. त्यांचे आतापर्यंत प्रदर्शन निराशाजनक राहिलेले आहे.
संघ : भारत-सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीशकुमार रे•ाr, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वऊण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव, तिलक वर्मा.
बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्जीद हसन तमीम, परवेझ हुसेन इमॉन, तौहीद ह्रदोय, महमुदुल्लाह, लिटन कुमेर दास, जाकेर अली अनिक, मेहिदी हसन मिराझ, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, तस्किन अहमद, शोरिफुल इस्लाम, तन्झीम हसन साकिब, रकीबुल हसन.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.