For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत, ऑस्ट्रेलिया महिला फुटबॉल लढत आज

06:43 AM Apr 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत  ऑस्ट्रेलिया महिला फुटबॉल लढत आज
Advertisement

वृत्तसंस्था/ पथुम थानी

Advertisement

येथे सुरू असलेल्या महिलांच्या 20 वर्षांखालील वयोगटातील एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क गटातील सामना खेळविला जाणार आहे. क गटातील भारताचा हा दुसरा सामना आहे.

या स्पर्धेतील क गटात झालेल्या सलामीच्या सामन्यात जपानने भारताचा 6-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करत विजयी सलामी दिली होती. या पराभवातून भारतीय महिला संघाने झालेल्या चूका सुधारण्यावर अधिक भर दिला असून रविवारच्या सामन्यात भारतीय संघ विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल, अशी आशा संघाचे प्रमुख प्रशिक्षक जोकीम अॅलेक्सेनडर्सन यांनी व्यक्त केली आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाला येथील हवामानाशी जुळवून घेताना पहिल्या सामन्यात खूपच अवघड गेले होते. आता भारताचे उर्वरित दोन सामने स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी 4 वाजता खेळविले जाणार आहेत. क गटामध्ये आघाडीचे स्थान मिळविण्यासाठी चुरस असली तरी भारताला या गटातील आपल्या दोन उर्वरित समान्यात विजयाची नितांत गरज आहे. प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ तसेच तीन गटातील तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघातील दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविणारे चार संघ पोलंडमध्ये 2026 च्या फिफाच्या 20 वर्षांखालील वयोगटातील फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पात्र ठरतील.

Advertisement

Advertisement
Tags :

.