For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-अमेरिका करार अद्याप दूरच!

06:22 AM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत अमेरिका करार अद्याप दूरच
Advertisement

अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधीचा दावा

Advertisement

वॉशिंग्टन: भारत-अमेरिका व्यापार करार त्वरित होणार नाही. चर्चा होऊ शकणाऱ्या उत्पादनांची यादी ठरली असली तर या कराराला पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो असे अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जॅमिसन ग्रीर यांनी सांगितले आहे. तर केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी एक आठवड्यापूर्वी भारत-अमेरिका व्यापार करार पूर्णपणे निश्चित झाल्याचे वक्तव्य केले होते.मिलवॉकीमध्ये जी20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत गोयल यांच्यासोबत माझी अत्यंत रचनात्मक चर्चा झाली आहे. दोन्ही देशांचे अधिकारी चर्चा जारी ठेवून आहेत. करार त्वरित होईल असे मला वाटत नाही. काही मुद्दे अडचणी निर्माण करत असून ते दूर करण्यासाठी आम्ही काम करत आहोत असे ग्रीर यांनी म्हटले आहे. गोयल यांचा दावा अमेरिका भारताला स्वत:च्या बाजारपेठेत योग्य प्रतिस्पर्धात्मक लाभ प्रदान करत असेल तरच हा व्यापार करार होऊ शकेल. भारताने 9 मुक्त व्यापार करारांना अंतिम रुप दिले असून ज्यात अमेरिकेसोबतचा करार जवळपास पूर्ण झाला असल्याचे गोयल यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते.

कशाचा अडथळा?

Advertisement

दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेली व्यापार विषयक चर्चा सध्या सुरू असली तरीही यात फारसे आश्वासक समोर आलेले नाही. अमेरिकेने भारतीय उत्पादनांसाठी प्रतिस्पर्धी देशांपेक्षा कमी आयातशुल्क आकारावे आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत प्राथमिकता द्यावी अशी भारताची इच्छा आहे. तर दुसरीकडे अमेरिका देखील स्वत:च्या काही कृषी उत्पादनांना भारतात प्रवेश मिळवून देण्यासाठी चर्चा करत आहे. अमेरिका आणि भारताने द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यासाठी व्यापार चौकटीला अंतिम रुप देण्याची घोषणा फेब्रुवारी महिन्यातच केली होती. परंतु शुल्क रचनेत बदलामुळे पुढील चर्चेची आवश्यकता निर्माण झाली. भू-राजनैतिक तणाव आणि अनपेक्षित शुल्क घोषणांच्या काळात भारत स्वत:च्या मुक्त व्यापार करारांच्या जाळ्याचा विस्तार करत आहे.

Advertisement
Tags :

.