भारत समृद्धीच्या दिशेनं !
आर्थिकदृष्ट्या आपली ताकद फुगवत चाललेल्या भारतात लोकांच्या घरात येणारी समृद्धीच्या गंगेचा लोटही वाढत चालला असून याची साक्ष देतेय ती वधारलेली संपत्ती...एकीकडे आपल्याकडील अब्जाधीश विक्रमी संख्येवर पोहोचलेत अन् तीच स्थिती आहे ‘अल्ट्रा-हाय नेट वर्थ’ असलेल्या व्यक्तींची...श्रीमंतीच्या लाटेवर केवळ महानगरं व मोठी शहरंच नव्हे, तर लहान नगरंही स्वार होऊ लागली असून या पार्श्वभूमीवर गरिबीच्या दरीतून नागरिकांना बाहेर काढण्याच्या बाबतीत जगात अव्वल क्रमांक प्राप्त करण्याची कामगिरी आपण करून दाखविलीय...
जागतिक बँकेच्या ऑक्टोबर, 2026 च्या ‘पॉव्हर्टी अँड इक्विटी ब्रीफ’ अहवालानुसार, जागतिक स्तरावर गरिबीत सर्वांत वेगवान घट नोंदवलीय ती भारतानं...2011 ते 2023 या काळात सुमारे 49 कोटी 60 लाख लोकांना अत्यंत गरिबीच्या खाईतून बाहेर काढण्यात आपल्याला यश आलंय...देशातील कमालीच्या गरिबीत जगणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण 2011 मधील 27.1 टक्क्यांवरून 2023 मध्ये 2.6 टक्क्यांपर्यंत खाली आलं...
2021 च्या ‘क्रयशक्ती समानते’नुसार, दररोज 4.20 डॉलर्सच्या ‘निम्न-मध्यम उत्पन्न’ गरिबी रेषे’च्या बाबतीतही घट दिसून आलीय. सदर कालावधीत या मर्यादेच्या खाली जगणाऱ्या लोकांचं प्रमाण 57.7 टक्क्यांवरून 16.1 टक्क्यांवर आलं...या प्रगतीला ‘जगातील सर्वांत जलद घट’ असं संबोधत जागतिक बँकेनं त्याचं मुख्य श्रेय उपभोग वाढीला, विशेषत: महिलांमधील वाढत्या रोजगाराला आणि अन्न अनुदानासह सामाजिक कल्याणकारी योजनांच्या विस्ताराला दिलंय...
येत्या काही वर्षांत भारतातील गरिबीची पातळी आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे, मात्र हा वेग काहीसा मंद असू शकतो. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार, दररोज 4.20 डॉलर्सच्या गरिबी रेषेखालील लोकसंख्येचं प्रमाण 2026 मधील 14.2 टक्क्यांवरून 2028 पर्यंत 12.1 टक्के इतकं खाली येऊ शकतं...तथापि, या संस्थेनं हे आकडे केवळ सूचक अंदाज असून श्रम बाजार नि व्यापक आर्थिक क्षेत्रातील नवीन आकडेवारी उपलब्ध झाल्यावर यात बदल होऊ शकतात असं सांगून सावध केलंय...
तरीही आव्हानं कायम...
मोठी प्रगती झालेली असली, तरी जागतिक बँकेनं प्रादेशिक व रोजगाराशी संबंधित आव्हानं अजूनही कायम असल्याचं नमूद केलंय...देशातील सुमारे 57 टक्के गरीब लोकसंख्या उत्तर प्रदेशपासून पश्चिम बंगालपर्यंत पसरलेल्या भौगोलिक पट्ट्यात विसावलीय...गरिबी कमी करण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी या राज्यांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करणं महत्त्वाचं असल्याचं अहवालात अधोरेखित करण्यात आलंय...
2017 ते 2023 या काळात भारताच्या कार्यरत मनुष्यबळात सुमारे 13.4 कोटी लोकांची भर पडली. याच कालावधीतील कार्यक्षम वयोगटातील लोकसंख्येच्या वाढीच्या ती जवळपास दुप्पट. रोजगारातील या वाढीचा मोठा हिस्सा ग्रामीण भागांतील महिलांच्या सशुल्क कामात प्रवेशामुळं पाहायला मिळालाय...मात्र, अहवालात श्रम बाजारातील काही नवीन समस्यांकडेही लक्ष वेधण्यात आलंय. आर्थिक वर्ष 2026 आणि 2027 च्या पहिल्या तिमाहीदरम्यान तऊणांमधील बेरोजगारीचं प्रमाण 14.6 टक्क्यांवरून 15.9 टक्क्यांपर्यंत वाढलंय. याचा सर्वाधिक फटका बसलाय तो ग्रामीण भागांतील तऊण महिलांना...याच काळात प्रत्यक्ष कमाईमध्ये फारसा बदल झालेला नाही, तर रोजगारातील वाढ प्रामुख्यानं कमी उत्पादकता असलेल्या क्षेत्रांत केंद्रीत राहिलीय...
लहान नगरांतही वाढतेय श्रीमंती...
भारतातील मोठ्या शहरांच्या जोडीला लहान नगरांतही संपत्ती वाढत चाललीय...आणि त्याच वेळी अतिश्रीमंत व्यक्तींची संख्याही विस्तारतेय...एका अहवालानुसार, भारतातील शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण परिसरांत वैयक्तिक संपत्ती अधिक वेगानं वाढू लागलीय...ग्रामीण भागांत वाढीचा दर 11 टक्के, तर शहरी परिसरांत 8 टक्के...
सध्या भारतातील संपत्ती व्यवस्थापन व्यवसायापैकी 85 टक्के हिस्सा ताब्यात आहे तो 10 बँका आणि ‘अॅसेट मॅनेजमेंट’ कंपन्यांच्या ताब्यात. त्यातील पहिल्या 10 संस्थांमध्ये केवळ तीन परदेशी नावांचा समावेश...‘स्टँडर्ड चार्टर्ड’, ‘ज्युलियस बेअर’ व ‘बार्कलेस्’. ज्या आस्थापनांचं लक्ष प्रामुख्यानं मोठ्या शहरांवर पेंद्रीत झालंय त्यांच्यासाठी ही वाढ देशाच्या इतर भागांतील ग्राहकांपर्यंत पोहोचायचं कसं आणि त्यांना सेवा कशी द्यायची असा प्रश्न निर्माण झालाय...
संपत्ती वाढीची व्याप्ती आता बाजारंमध्ये दिसून येतेय...एका आकडेवारीनुसार, ग्रामीण बाजारपेठेशी संबंधित शेअर्सनी 2025 मध्ये शहरी बाजारपेठेतील शेअर्सच्या तुलनेत सुमारे 30 टक्के गुणांनी अधिक चांगली कामगिरी केली. याउलट, शहरी मार्केटमधील समभाग (यामध्ये मोठे डिपार्टमेंट स्टोअर्स, रेस्टॉरंट्स, कपडे आणि दागिने क्षेत्रांचा मोठा वाटा) 15 टक्क्यांनी घसरले...गतवर्षी चांगल्या मान्सूनमुळं ग्रामीण भागांतील जीवनावश्यक वस्तू, दुचाकी आणि ट्रॅक्टरच्या विक्रीनं शहरांना मागं टाकलं होतं, तर ‘टियर-2’ आणि ‘टियर-3’ शहरांमध्ये प्रीमियम वाहनांची मागणीही टिकून राहिली...
संपत्तीचं वितरण अधिक उच्च स्तरावरही विस्तारत चाललंय...थोडक्यात सांगायचं झाल्यास दोन प्रकारचे ग्राहक गट फुगताहेत. मोठ्या शहरांच्या बाहेर नव्यानं श्रीमंत झालेले लोक आणि ‘अल्ट्रा-हाय नेट वर्थ’ गटातील व्यक्ती...
गुंतवणुकीलाही भन्नाट वेग...
या पार्श्वभूमीवर 2020 पासून भारतात वित्तीय मालमत्ता आणि बाजारपेठांमधील किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वेगानं वाढलाय. याचा अर्थ अधिक भारतीय लोक गुंतवणूक करताहेत...एका आकडेवारीनुसार, वित्तीय मालमत्तेच्या साठ्यात सर्वसमावेशक वृद्धी दिसून येते. विशेषत: 2020 नंतर विविध श्रेणींमध्ये या वाढीनं अधिक वेग पकडलाय. म्युच्युअल फंडांतर्गत व्यवस्थापित मालमत्ता 82.6 लाख कोटी ऊपयांपर्यंत पोहोचलीय, तर बँकांमधील मुदत ठेवींनी स्तर गाठलाय तो 164.2 लाख कोटी ऊपयांचा...या दोन्ही श्रेणींमध्ये सातत्यानं वाढ दिसून आलीय...
किरकोळ गुंतवणूकदारांची इक्विटी होल्डिंग्स 34.6 लाख कोटी ऊपयांपर्यंत पोहोचली असून 2020 नंतर त्यात मोठी वाढ झालीय. तर प्रचंड संपत्ती असलेल्या व्यक्तींच्या इक्विटी होल्डिंग्सनं धडक दिलीय ती 9.9 लाख कोटी ऊपयांना...देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या बाबतीत हा आकडा 89.7 लाख कोटी ऊपयांच्या घरात गेलेला असून ‘एनपीएस’च्या अंतर्गत व्यवस्थापित मालमत्ता 18.2 लाख कोटी ऊपयांवर झेपावलीय...हा कल देशांतर्गत गुंतवणुकीचे स्रोत अन् ‘पेन्श’च्या रुपात बचतीचा वाढता आवाका दर्शवितो...
‘इक्विटी म्युच्युअल फंडां’मध्ये दरमहा 38,294 कोटी ऊपयांचा निव्वळ ओघ लोटत असल्याचं दिसून आलंय...2020-21 च्या सुमारास हा आकडा नकारात्मक पातळीवरही गेला होता, त्यानंतर त्यात पुन्हा सुधारणा झालीय...
सर्वसामान्यांची डोकेदुखी कायम...
असं असलं, तरी सर्व कौटुंबिक खर्च केल्यानंतर सर्वसामान्य भारतीयांकडे बचत किंवा गुंतवणुकीसाठी किती पैसे राहतात अन् भारतीय लोक अधिक बचत करताहेत की त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा अजूनही केवळ मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च होतोय हे प्रश्न मिटत नाहीत...सांख्यिकी मंत्रालयाच्या 2023-24 च्या ‘घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षणा’नुसार ग्रामीण भारतात दरडोई सरासरी मासिक खर्च वाढलाय (यात सरकारी योजनांतर्गत मोफत मिळणाऱ्या वस्तूंच्या मूल्याचा समावेश नाही)...हे आकडे प्रति व्यक्ती होणारा घरगुती खर्च दर्शवतात, उत्पन्न किंवा बचत नव्हे. तरीही कुटुंबं विविध वस्तूंवर किती खर्च करतात त्याचं एक उपयुक्त चित्र यातून मिळतं. घरभाडं, अन्न, शिक्षण, वाहतूक, आरोग्यसेवा आणि कर्जाची परतफेड यावरील खर्चानंतर कुटुंबांकडे मालमत्ता निर्माण करण्यासाठी खूप कमी पैसे राहतात....
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, महामारीच्या काळात 2020-21 मध्ये ‘जीडीपी’च्या तुलनेत 11.5 टक्के इतकी उच्चांकी पातळी गाठल्यानंतर कुटुंबांची निव्वळ आर्थिक बचत लक्षणीयरीत्या घटलीय. 2022-23 आणि 2023-24 मध्ये हे प्रमाण सुमारे 5.3 टक्के इतकं खाली आलं...खर्चाचा दबाव प्रत्येक कुटुंबासाठी सारखा नसतो. ज्या कुटुंबाचं स्वत:चं घर आहे त्यांचा गृहखर्च भाड्यानं राहणाऱ्यांपेक्षा कमी असू शकतो. त्याचप्रमाणं वृद्ध पालकांची जबाबदारी सांभाळणाऱ्या किंवा मुलांच्या शिक्षणावर खर्च करणाऱ्यांकडे कमी रक्कम राहू शकते. म्हणूनच पगार वाढला म्हणजे आपोआप संपत्तीही वाढतेच असं नाही...
खर्च वाढला, असमानतेची दरीही विस्तारली...
? सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शहरी भारतात दरडोई सरासरी मासिक खर्च 2022-23 मधील 5,936 ऊपयांवरून 2023-24 मध्ये 6,996 ऊपयांपर्यंत वाढला...ग्रामीण भारतात याच कालावधीत हा आकडा 3,773 वरून 4,122 रुपयांपर्यंत वधारला...
? उत्पन्नातील असमानताही मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून अन्य एका अंदाजानुसार, 2022-23 मध्ये देशातील सर्वाधिक उत्पन्न असलेल्या 10 टक्के लोकांकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा होता तो 58 टक्के इतका, तर सर्वांत कमी उत्पन्न असलेल्या 50 टक्के लोकांच्या वाट्याला केवळ 15 टक्के हिस्सा...
? एका सर्वेक्षणानुसार, 2023-24 मध्ये भारतातील सुमारे 46 टक्के कार्यबल शेती क्षेत्रात गुतलं होतं. हंगामी स्वरूपाचं काम अन् अनिश्चित उत्पन्न यामुळं त्यांना आर्थिक सुरक्षा मिळवणं कठीण होतंय. याचा दाखला यंदा पावसानं दिलेल्या हुलकावणीमुळं मिळालाय...
अब्जाधीशांच्या संख्येत भरीव वाढ...
? भारतातील श्रीमंत अधिक धनवान होताहेत आणि हा वर्ग जगातील इतर अनेक देशांच्या तुलनेत अधिक वेगानं विस्तारतोय...‘’नाईट फ्रँक’च्या ‘द वेल्थ रिपोर्ट 2026’च्या ताज्या आवृत्तीनुसार, भारत आता जागतिक स्तरावर अब्जाधीशांच्या संख्येत सर्वाधिक वाढ होणाऱ्या देशांपैकी एक बनलाय..विशेष म्हणजे चीन व अमेरिका यासारख्या आर्थिक महासत्तांचा समावेश या यादीत नाही.
? या अहवालानुसार, 2026 ते 2031 या काळात भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत 51 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे...त्यांनी या बदलाचं वर्णन ‘जलद विस्तार आणि मोठ्या प्रमाणात आलेली सुदृढ स्थिरता’ अशा शब्दांत केलंय...
? 2021 ते 2026 या काळात भारतातील ‘अल्ट्रा-हाय नेट वर्थ’असलेल्या म्हणजेच 3 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती बाळगणाऱ्या लोकांची संख्या 63 टक्क्यांनी वाढून 12 हजारांवरून सुमारे 20 हजारांवर पोहोचलीय...ही वृद्धी इथंच थांबणारी नाही. अहवालातील अंदाजानुसार, 2031 पर्यंत यात आणखी 27 टक्क्यांची भर पडेल. यामुळं भारतातील अतिश्रीमंत व्यक्तींचा आकडा पार करेल तो 25 हजारांचा स्तर...
? या यादीत भारताच्या पुढं आहेत केवळ सौदी अरेबिया, पोलंड, स्वीडन व ऑस्ट्रेलिया हे देश...
? ‘फोर्ब्स’च्या ताज्या अहवालानुसार, गेल्या वर्षभरात भारतात 27 नवीन अब्जाधीशांची भर पडलीं असून त्यांची एकूण संख्या विक्रमी 391 वर पोहोचलीय. पाच वर्षांपूर्वी ही संख्या होती 237 इतकी...
? 2026 च्या यादीत असलेल्या 1,810 व्यक्तींची संपत्ती किमान 1 हजार कोटी ऊपये. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 128 नं आणि पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत 803 नं अधिक...त्यांची एकत्रित संपत्ती 187.5 लाख कोटी ऊपये (सुमारे 1.96 ट्रिलियन डॉलर्स) म्हणजे भारताच्या ‘जीडीपी’च्या जवळपास निम्मी...
- राजू प्रभू
