महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताला 2047 पर्यंत अव्वल पाच क्रीडा राष्ट्रांत स्थान

06:00 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

भारत 2047 पर्यंत जगातील अव्वल पाच क्रीडा राष्ट्रांमध्ये असेल. तीन वर्षांपूर्वी ‘कोविड-19’मुळे उलथापालथ चालू असताना हे उद्दिष्ट साध्य करण्याचा आराखडा तयार करण्यात आला, असे क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी सांगितले. मांडविया म्हणाले की, 2047 पर्यंत भारताला महासत्ता बनविण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत खेळ हे एक भर दिलेले क्षेत्र आहे. ‘जेव्हा देश कोविड-19 च्या लॉकडाऊनमध्ये होता तेव्हा सरकार 2047 च्या दृष्टीने विचारमंथन करत होते आणि 2047 साठी आराखडा बनवत होते. त्या आराख्घ्ड्याचा एक घटक खेळही आहे’, असे मांडविया यांनी पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या भारताच्या तयारीवरील चर्चेदरम्यान सांगितले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने दिल्ली स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशनने या चर्चेचे आयोजन केले होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article