For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जेएलआर रेंज रोव्हर बनणार भारतात

06:55 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
जेएलआर रेंज रोव्हर बनणार भारतात
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशातील मोठी ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स यांची सहकारी कंपनी जग्वार लँड रोव्हर एक नवा इतिहास रचू पाहते आहे. 1970 नंतर असे पहिल्यांदाच घडत आहे. जग्वार लँड रोव्हर अंतर्गत रेंज रोव्हर आणि रेंज रोव्हर स्पोर्टस् या कार्सची निर्मिती भारतातच केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सदरच्या कारची निर्मिती कंपनी या आधी इंग्लंडमधील सोलिहूल येथेच करत होती. जेएलआर इंडियाच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात बनणाऱ्या जग्वारच्या वरील कार्सच्या किंमती सध्याच्या तुलनेमध्ये 18 ते 22 टक्के कमी असणार आहेत. देशांतर्गत पातळीवर तयार करण्यात आलेल्या रेंज रोव्हरची डिलिव्हरी मे अखेरपासून सुरु होणार आहे. तर रेंज रोव्हर स्पोर्टस्ची डिलिव्हरी ऑगस्ट महिन्यामध्ये केली जाणार आहे. रेंज रोव्हर स्पोर्टस् या गाडीची किंमत 1 कोटी 40 लाख इतकी असणार असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

पुण्यामधील जेएलआरच्या प्लांटमध्ये आधीपासूनच रेंज रोव्हर वेलार, ईवोक, जग्वार एफ पेस आणि डिस्कव्हरी स्पोर्टस् यांची निर्मिती केली जाते. आता यामध्ये वर सुचविल्याप्रमाणे दोन कार्सची भर पडणार आहे.

इलेक्ट्रिक कार येणार यावर्षी

जेएलआर कंपनीने इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीवरही लक्ष केंद्रीत केले असून  नव्या कार सादरीकरणासंदर्भातील योजना गतिमान केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीची इलेक्ट्रीक कार 2030 मध्ये भारतात लाँच केली जाणार आहे. कंपनी 6 नव्या कार्स या गटात सादर करणार असल्याचे समजते.

Advertisement
Tags :

.