महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत-स्वीडन डेव्हिस लढत उद्यापासून

06:00 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/स्टॉकहोम

Advertisement

यजमान स्वीडन आणि भारत यांच्यात 2024 च्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील विश्वगट-1 मधील लढतीला येथे शनिवार दि. 14 सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. या लढतीसाठी भारतीय संघामध्ये अव्वल टेनिसपटूंची गैरहजेरी असली तरी त्यांना स्वीडनवर पहिला विजय मिळविण्याची संधी आहे.

Advertisement

डेविस चषक स्पर्धेच्या इतिहासामध्ये आजपर्यंत भारतीय संघाला स्वीडनवर एकदाही विजय मिळवता आलेला नाही. भारतीय डेव्हिस चषक संघाचे येथे गुरुवारी आगमन झाले. भारताचे अव्वल टेनिसपटू सुमित नागल आणि युकी भांब्री विविध कारणास्तव या लढतीत उपलब्ध राहू शकणार नाहीत. भारतीय संघाने या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत पाचवेळा स्वीडनबरोबर लढत दिली. पण त्यांना एकदाही विजय प्राप्त करता आला नाही. या लढतीसाठी स्वीडनच्या डेव्हिस चषक संघामध्ये अव्वल खेळाडूंची गैरहजेरी असल्याने भारताला ही लढत जिंकण्याची नामी संधी आहे. मात्र स्वीडनमध्ये ही लढत होत असल्याने त्यांच्या खेळाडूंना भारताच्या तुलनेत अधिक प्रोत्साहन मिळेल. ही लढत रॉयल टेनिस हॉलमध्ये खेळविली जाणार आहे.

या लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात रामकुमार रामनाथन् खेळणार आहे. मात्र दुसऱ्या एकेरीच्या सामन्यासाठी भारतीय स्पर्धक अद्याप निश्चित झालेला नाही. निकी पुनाचा किंवा एन. श्रीराम बालाजी यापैकी एकाला दुसऱ्या एकेरी सामन्यात संधी दिली जाईल. त्याच प्रमाणे राष्ट्रीय विजेता सिद्धार्थ विश्वकर्मा हा एक पर्याय असू शकेल. भारतीय डेव्हिस संघाचा कर्णधार रोहीत राजपाल कदाचित एन. श्रीराम बालाजीला एकेरीत खेळण्यासाठी आदेश देईल, असा अंदाज आहे. यापूर्वी डेव्हिस चषक लढतीत ग्रासकोर्टवर पाक विरुद्धच्या सामन्यात बालाजीने पाकच्या अनुभवी अकिल खानला पराभूत केले होते.

या लढतीमध्ये शनिवारी एकेरीचे  पहिले दोन सामने खेळविले जातील. त्यानंतर रविवारी महत्वाचा दुहेरी सामना आयोजित केला आहे. सोमवारी परतीचे दोन एकेरीचे सामने होणार आहेत. रविवारी होणाऱ्या दुहेरी सामन्यात एन. बालाजी निश्चित भारताचे प्रतिनिधीत्व करेल, असा अंदाज आहे. स्वीडनच्या संघामध्ये बोर्ग, आंद्रे, गोरानसन, फिलीप, बेरगेव्ही यांचा समावेश आहे. भारतीय डेव्हिस संघाला नवे प्रशिक्षक आशुतोष सिंगचे मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article