For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-श्रीलंका उपांत्य लढत उद्या

06:45 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत श्रीलंका उपांत्य लढत उद्या
Advertisement

वृत्तसंस्था, निशिन

Advertisement

आशियाई क्रीडा स्पर्धेतील उपांत्य फेरीत भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा सामना श्रीलंकेशी गुरुवारी होणार आहे. मंगळवारी खराब हवामानामुळे श्रीलंका आणि नेपाळ यांच्यातील उपांत्यपूर्व सामना रद्द करावा लागल्याने श्रीलंकेने उपांत्य फेरीत धडक मारली.

संघ क्रमवारीतील वरच्या स्थानामुळे श्रीलंका उपांत्य फेरीत पोहोचली. श्रीलंका संघ क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे तर नेपाळ 14 व्या स्थानावर आहे. नागोयामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे, ज्यामुळे भारताच्या सामन्यासह चारही उपांत्यपूर्व नसामने पावसामुळे वाया गेले. दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि बांगलादश यांच्यात खेळला जाईल. दोन्ही उपांत्य सामने गुरुवारी होणार आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने ‘कोरोगी स्पोर्ट्स पार्क’वर अद्याप एकही सामना खेळलेला नाही. याच मैदानावर महिलांची स्पर्धाही झाली होती, जी हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने जिंकली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.