For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-दक्षिण आफ्रिका पहिली कसोटी आजपासून

06:10 AM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारत दक्षिण आफ्रिका पहिली कसोटी आजपासून
Advertisement

पाहुण्यांच्या फिरकी माऱ्याची भारताला काळजी, यजमानांच्या फलंदाजीतील खोलीची लागणार कसोटी

Advertisement

वृत्तसंस्था/कोलकाता

आज शुक्रवारपासून येथे सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत जेव्हा दक्षिण आफ्रिका व भारत हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडतील तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या दर्जेदार फिरकी गोलंदाजांविऊद्ध भारताच्या फलंदाजीच्या खोलीची कसोटी लागेल.

Advertisement

गेल्या वर्षी न्यूझीलंडविऊद्धच्या घरच्या मैदानावर झालेल्या पराभवाच्या भूतांनी भारताला पछाडणे अजूनही सोडलेले नाही. किवी फिरकी गोलंदाज एजाज पटेल, मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्स यांनी तीन कसोटी सामन्यात 36 बळी घेऊन अभूतपूर्व 0-3 असा व्हाईटवॉश दिला होता. सध्या दक्षिण आफ्रिका फिरकी गोलंदाजांवर भरपूर अवलंबून असल्याने सतत फिरकी गोलंदाजांच्या दबावाविऊद्धचे ते कोलमडणे यजमान संघाच्या सामूहिक स्मृतीत कायम राहील. विद्यमान जागतिक कसोटी विजेते नेहमीच आक्रमक वेगवान गोलंदाजांसाठी ओळखले गेले आहे. परंतु सध्या त्यांच्याकडे जागतिक क्रिकेटमधील सर्वांत शक्तिशाली फिरकी विभागांपैकी एक आहे.

पाकिस्तानविऊद्धच्या 1-1 अशा बरोबरीनंतर दक्षिण आफ्रिकेने येथे प्रवेश केला आहे. सदर निकाल त्यांनी प्रेरणादायी कर्णधार टेम्बा बवुमा याच्याशिवाय मिळवला होता. दक्षिण आफ्रिकेचे फिरकी त्रिकुट केशव महाराज, सायमन हार्मर आणि सेनुरन मुथुसामी यांनी त्या मालिकेत 39 बळींपैकी 35 बळी घेतले आणि पाकिस्तानच्या नोमान अली, साजिद खान, आसिफ आफ्रिदी आणि सलमान आगा यांच्या फिरकी विभागाला मागे टाकले. त्यांनी एकत्रितपणे 27 बळी घेतले. भारताचे साहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशाटे यांनी प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजी विभागाला उपखंडातील शैलीचा मारा, असे म्हटले असून त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

त्यांच्याकडे चार फिरकीपटू आहेत आणि बहुदा ते तीन खेळवतील. हे उपखंडातील एखाद्या संघाविऊद्ध खेळण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. आम्ही ही बाब सुऊवातीलाच हाताळली आहे. आशा आहे की, आम्ही न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून शिकलो आहोत, असे डोईशाटे म्हणाले. सायमन हार्मर, जो आता 36 वर्षांचा आहे आणि ज्याने 1,000 प्रथम श्रेणी बळी मिळविलेले आहेत, तो भारतीय परिस्थितीशी अनोळखी नाही. 2015 च्या हाशिम अमलाच्या नेतृत्वाखाली तो मोहाली आणि नागपूर येथे दोन कसोटी सामने खेळला होता आणि चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा आणि वृद्धिमान साहासारखे मौल्यवान फलंदाज त्याने टिपले होते. हे फलंदाज त्यांच्या फिरकी खेळण्याच्या कौशल्यासाठी ओळखले जातात.

त्याला एक दशक उलटले असले, तरी हार्मर अजूनही तितकाच चतुर आहे. गेल्या महिन्यात रावळपिंडी येथे झालेल्या सामन्यात आठ बळी घेऊन दक्षिण आफ्रिकेची पाकिस्तानविरुद्धची मालिका बरोबरीत आणणाऱ्या विजयानंतर तो कोलकात्यात पोहोचला आहे. त्याचे नियंत्रण आणि वेगात बदलांमुळे तो आधुनिक खेळातील सर्वांत अचूक आणि आक्रमक फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेला डावखुरा फिरकी गोलंदाज महाराजसाठी एक आदर्श साथीदार बनला आहे. त्यामुळे ईडन गार्डन्सची खेळपट्टी सर्वांत महत्त्वाचा घटक बनली आहे. भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक आणि कर्णधार शुभमन गिल यांनी अनेक वेळा खेळपट्टीची पाहणी केली आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही आश्वासन दिले आहे की, खेळपट्टी फिरकीस भरपूर पोषक राहणार नाही.

त्यामुळे जसप्रीत बुमराह खूश होईल. या ठिकाणी नेहमी चेंडू सुरुवातीला स्विंग आणि उशिरा रिव्हर्स स्विंग होत आला आहे. अशा ठिकाणी बुमराह भारताचा ट्रम्प कार्ड असू शकतो. भारत दोन वेगवान गोलंदाजांसह खेळण्याचा विचार करेल आणि असे दिसते की, स्थानिक आकाश दीपला परिस्थितीचे ज्ञान असल्याने त्याला पसंती मिळू शकते.

गेल्या 15 वर्षांत वेगवान गोलंदाजांनी येथे कसोटी सामन्यांमध्ये 61 टक्के (159 पैकी 97 बळी) घेतले आहेत. कारण सीम आणि स्विंग हे येथे महत्त्वाचे ठरलले आहेत, विशेषत: सुऊवातीच्या आणि शेवटच्या टप्प्यात. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील तऊण भारतीय संघाने या उन्हाळ्यात इंग्लंडमध्ये स्विंगला अनुकूल परिस्थितीत लवचिकता दाखवत आणि जुळवून घेत 2-2 अशी बरोबरी साधली. परंतु घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धचा पराभव सलणे अजूनही कायम आहे. विद्यमान जागतिक कसोटी स्पर्धेचा भाग राहिलेली कमकुवत वेस्ट इंडिज संघाविऊद्धची मालिका त्यानंतर भारताने 2-0 अशी जिंकलेली असली, तरी सदर मालिकेने भारताच्या पुनऊज्जीवनाची फारशी परीक्षा घेतली नाही.

भारतातर्फे फिरकी गोलंदाजीचा भक्कमपणे सामना करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल. रिषभ पंत पुन्हा तंदुऊस्त झाल्यामुळे आणि फॉर्ममध्ये असलेला ध्रुव जुरेल एक फलंदाज म्हणून खेळण्यासाठी सज्ज झाल्यामुळे मधली फळी अधिक स्थिर दिसते. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 16 बळी घेऊन भारताच्या फिरकी गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावणारा वॉशिंग्टन सुंदर एक अतिरिक्त पर्याय देतो आणि तो फलंदाजीतही कामी येईल. टेन डोइशाटेने या मालिकेसंदर्भात बोलताना म्हटले आहे, ‘खेळाडूंना मानसिकरीत्या सज्ज व्हावे लागेल आणि 16-17 दिवसांच्या खरोखर कठीण कामासाठी तयार राहावे लागेल. शरीर स्वत:ची काळजी घेईल, मन तयार असले पाहिजे’

ही फक्त दोन सामन्यांची मालिका असल्याने चुका परवडणाऱ्या नाहीत. गुवाहाटी येथे होणाऱ्या शेवटच्या कसोटीत अपरिचित परिस्थिती भूमिका बजावणार असल्याने लवकर मागे पडणे घातक ठरू शकते. गुवाहाटी त्या सामन्याद्वारे कसोटी स्थळ म्हणून पदार्पण करणार आहे. भारतासाठी मोठी धावसंख्या उभारणे आणि विरोधी संघावर दबाव आणणे ही गेल्या वर्षीच्या पराभवाच्या भूतांना बाहेर काढण्याची गुऊकिल्ली असेल.

►भारत-शुभमन गिल (कर्णधार), के. एल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, रिषभ पंत (उपकर्णधार), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि देवदत्त पडिक्कल.

►दक्षिण आफ्रिका : टेम्बा बवुमा (कर्णधार), एडन मार्करम, रायन रिकल्टन, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन, डेवाल्ड ब्रेविस, झुबेर हमझा, टोनी डी झोर्झी, कॉर्बिन बॉश, विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, सेनुरान मुथुसामी, कागिसो रबाडा, सायमन हार्मर.

सामन्याची वेळ : सकाळी 9.30 वा.

Advertisement
Tags :

.