For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेपाळच्या संकटात भारताचा मदतीचा हात;10टन मदत साहित्य हवाईमार्गे रवाना

12:01 PM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेपाळच्या संकटात भारताचा मदतीचा हात 10टन मदत साहित्य हवाईमार्गे रवाना
Advertisement

नवी दिल्ली : भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये ढगफुटी, मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. या संकटाच्या काळात भारताने पुन्हा एकदा शेजारधर्म निभावत नेपाळच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

Advertisement

भारताकडून नेपाळला10 टन मदत साहित्य हवाईमार्गे पाठवण्यात आले आहे. या मदत सामग्रीमध्ये अन्नधान्य, औषधे, सोलर लॅम्प तसेच आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या इतर वस्तूंचा समावेश आहे.

पूर आणि भूस्खलनामुळे प्रभावित झालेल्या भागांमध्ये मदतकार्य सुरू असून, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक भागांमध्ये संपर्क व्यवस्था आणि वाहतूकही प्रभावित झाली आहे.

Advertisement

दरम्यान, भारताने नेपाळला बचाव आणि मदतकार्यासाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. आपत्तीच्या काळात नेपाळच्या नागरिकांना आवश्यक मदत मिळावी यासाठी भारताकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

नेपाळमधील परिस्थिती गंभीर असताना भारताने केलेल्या या मदतीमुळे दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण आणि सहकार्याचे संबंध पुन्हा अधोरेखित झाले आहेत.

Advertisement
Tags :

.