भारत डिजिटल ब्लॅकआउटमध्ये दुसरा
मागील वर्षी देशात इंटरनेट बंद पडण्याच्या 84 घटना
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
जग डिजिटल झाले आहे आणि इंटरनेटशिवाय जीवन जवळजवळ अपूर्ण मानले जात आहे, अशा युगात जेव्हा आभासी जगाशी कनेक्शन तोडले तर काय होईल याची कल्पना करणे कठीण नाही. गेल्या काही वर्षांत, अशी अनेक प्रकरणे घडली आहेत जेव्हा विविध कारणांमुळे इंटरनेट बंद पडल्याने जगभरात खळबळ उडाली.
ग्लोबल टेक पॉलिसी अँड इंटरनेट राइट्स अॅडव्होकेसी ग्रुप अॅक्सेस नाऊ आणि कीप इट ऑन मोहिमेनुसार, गेल्या वर्षी जगातील 54 देशांमध्ये इंटरनेट बंद पडण्याच्या 296 घटना घडल्या, ज्यामध्ये भारत डिजिटल ब्लॅकआउटच्या 84 घटनांसह दुसऱ्या क्रमांकावर होता तर म्यानमार 85 डिजिटल ब्लॅकआउटसह पहिला देश होता. पाकिस्तानला 21 वेळा इंटरनेट बंदीचा सामना करावा लागला.
2024 मध्ये विविध प्रकारच्या संघर्षांमुळे 103 वेळा इंटरनेट बंद पडले होते तर स्थानिक पातळीवरील निषेधांमुळे 24 देशांमध्ये 74 वेळा या परिस्थितीचा सामना करावा लागला. भारत, अल्जेरिया, जॉर्डन, केनिया, इराक, मॉरिटानिया आणि सीरियामध्ये परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी 16 वेळा इंटरनेट कनेक्शन कापण्यात आले, तर अझरबैजान, कोमोरोस, भारत, मॉरिटानिया, मोझांबिक, पाकिस्तान, युगांडा आणि व्हेनेझुएला येथे निवडणुकीत छेडछाड टाळण्यासाठी 12 वेळा इंटरनेट बंद करण्यात आले.