भारत-रशिया सागरी मार्गे वाढणार व्यापार
मार्गाचे नियोजन अंतिम टप्प्यात : वाणिज्य दूत ओलेग एन अवदेव यांचे संकेत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारताकडून चेन्नई बंदर आणि रशियाच्या व्लादिवोस्तोक बंदरादरम्यान जहाज ऑक्टोबरमध्ये पाठवण्यात आले होते, यातून आता नव्याने दोन देशात वस्तुंची देवाणघेवाण शक्य होणार आहे. सोव्हिएत युनियन काळातील सागरी व्यापार मार्ग पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती चेन्नईतील रशियन फेडरेशनचे वाणिज्य दूत ओलेग एन अवदेव यांनी सांगितले आहे. या मार्गाने प्रवास करण्यासाठी जहाजाला केवळ 17 दिवस लागले. तसेच, भारतीय बंदरांपासून सेंट सुएझ कालव्याद्वारे पीटर्सबर्ग इथपर्यंत हा प्रवास राहणार असल्याची माहिती आहे. अवदेव म्हणाले, ‘आम्ही चेन्नई-व्लादिवोस्तोक सागरी मार्ग प्रत्यक्षात सुरू करण्याच्या अंतिम टप्प्यात आहोत. हा सागरी मार्ग ईस्टर्न मेरीटाईम कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो आणि भारताचा पूर्व किनारा आणि रशियाचा सुदूर पूर्व किनारा जोडतो तसेच या मार्गाला मंजुरी देण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले. अवदेव म्हणाले की, अंतिम चर्चेसाठी रशियन प्रतिनिधी भारतात येण्यास तयार आहेत आणि मुख्य कार्यक्रम चेन्नई येथे होणार होता. भारतीय अधिकाऱ्यांच्या मते हा कार्यक्रम जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे.
वेगाने काम सुरु : सुनील पालीवाल
‘या दिशेने काम वेगाने सुरू आहे, चेन्नई पोर्टला अभ्यास करण्याची आणि व्यवहार्यतेचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आम्ही चार वस्तूंमध्ये घाऊक व्यापार ओळखला आहे ज्यात वाढीची प्रचंड क्षमता आहे. आम्हाला आढळले आहे की जर आपण सुदूर पूर्व रशियामधून कोकिंग कोळसा घेतला तर तो 1000 रुपये प्रति टन स्वस्त होईल.