महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘एससीओ’मध्ये भारताची पाकिस्तान-चीनला फटकार

06:58 AM Oct 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दहशतवाद संपवल्याशिवाय व्यापार नाही : चीनला सीमारेषेचा आदर करण्याचा सल्ला

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

Advertisement

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानमध्ये शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीत संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी दहशतवाद आणि व्यापार एकत्र येऊ शकत नसल्याचे स्पष्ट करतानाच दहशतवाद संपवल्याशिवाय संबंधित देशांशी व्यापारी संबंध वृद्धिंगत होऊ शकत नाहीत, असे पाकिस्तानच्या भूमीत जाऊन ठणकावले. तसेच पाकिस्तान-चीनचे नाव न घेता सर्व देशांनी एकमेकांच्या सीमांचा आदर करणे आवश्यक असल्याचा सल्लाही एस. जयशंकर यांनी दिला.

भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर पाकिस्तानमधील शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत सहभागी झाले होते. आपल्या भाषणात त्यांनी दहशतवाद संपवण्यावर विशेष भर दिला. एससीओ सदस्य देशांमधील मैत्रीत घट झाली असेल आणि शेजारी संबंध बिघडले असतील तर याचा विचार व्हायला हवा, असे भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. जर आमच्यातील विश्वास कमी झाला असेल तर आपण स्वत:मध्ये डोकावून त्याचे कारण समजून घेणे आवश्यक आहे. त्यापूर्वी, एससीओ बैठकीचे उद्घाटन करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानला शांतता, सुरक्षा आणि आर्थिक प्रगती हवी असल्याचा दावा केला होता. एससीओ ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून त्याचा उद्देश राजकीय, आर्थिक आणि लष्करी सहकार्याला प्रोत्साहन देणे आहे. 2001 मध्ये चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या नेत्यांनी संयुक्तपणे त्याची स्थापना केली होती.

विकासासाठी दहशतवादाशी लढा आवश्यक

एससीओचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेक्मयांशी लढा देणे आवश्यक आहे. यासाठी एकमेकांमध्ये विश्वास आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे. कोरोना महामारी तसेच इस्रायल-हमास-हिजबुल्लाह आणि रशिया-युव्रेन संघर्षाचा संदर्भ देत जयशंकर म्हणाले की, ही बैठक अत्यंत कठीण काळात होत आहे. हवामान बदलापासून पुरवठा साखळीपर्यंत अनेक समस्या आहेत. याचा विकासावर परिणाम होत असल्याचे त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले.

डिनरप्रसंगी हस्तांदोलन

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मंगळवारी रात्री एससीओ नेत्यांसाठी डिनरचे आयोजन केले होते. याप्रसंगी शाहबाज शरीफ आणि जयशंकर यांची भेट झाली असता दोघांनीही हस्तांदोलन केले. गेल्यावषी गोव्यात झालेल्या एससीओ बैठकीत जयशंकर यांनी पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांना अभिवादन करताना हस्तांदोलन टाळले होते. रात्रीच्या जेवणानंतर एससीओ नेत्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमही झाला. यामध्ये एका पाकिस्तानी कलाकाराने भरतनाट्याम सादर केले. यादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ चीन आणि कझाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत बसलेले दिसले. डिनरदरम्यान भारताचे प्रतिनिधी एस. जयशंकर आणि चीनचे पंतप्रधान ली कियांग यांचीही भेट झाली. याप्रसंगी दोघांनी काही वेळ चर्चा केली.

पाकिस्तानला शांतता हवी : शाहबाज शरीफ

एससीओ बैठकीचे उद्घाटन करताना शाहबाज शरीफ म्हणाले की, पाकिस्तानला शांतता, सुरक्षा आणि सामाजिक-आर्थिक प्रगती हवी आहे. अफगाणिस्तानची आपल्याशी जमीन सीमा असल्यामुळे तेथील शांतता आपल्यासाठी महत्त्वाची आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर शेजाऱ्यांविऊद्ध दहशतवादासाठी होऊ नये. मजबूत एससीओसाठी चांगल्या कनेक्टिव्हिटीची आवश्यकता आहे. चीन आणि पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा विस्तार झाला पाहिजे. या भागात अनेक लोक गरिबीत जीवन जगत असल्यामुळे त्यांचा विकास होणे अपेक्षित आहे. अशा प्रकल्पांकडे संकुचित विचाराने बघू नये, असेही ते म्हणाले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article