For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सऊदी अरबमधून कच्च्या तेलाच्या आयातीवर भारताचा भर

06:21 AM Feb 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
सऊदी अरबमधून कच्च्या तेलाच्या आयातीवर भारताचा भर
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

रशियन तेलाच्या आयातीवर अमेरिकेने निर्बंध आणल्यानंतर भारताने तेलाची आयात कमी केली आहे. याच दरम्यान भारताने कच्च्या तेलाची आयात आता सौदी अरबमधून करायला सुरुवात केली आहे.

 किती बॅरल प्रतिदिन होतेय आयात

Advertisement

नोव्हेंबर 2019 नंतर फेब्रुवारीमध्ये केलेली कच्च्या तेलाची आयात सर्वाधिक मानली जात आहे. कच्च्या तेलाची आयात 1 ते 1.1 दशलक्ष बॅरल प्रतिदिन इतकी होती असेही सांगितले जात आहे. सौदी अरब हा सध्याच्या स्वरूपामध्ये पाहता रशियाला मागे टाकत भारताला सर्वाधिक कच्च्या तेलाची पूर्तता करत आहे. जागतिक डाटा आणि अॅनालिटीक्स सेवा देणारी कंपनी केपलर यांच्या माहितीनुसार 20 फेब्रुवारी रोजी पश्चिम आशियाई देशांमधून या तेलाची आयात 1.3 दशलक्ष बॅरल इतकी राहिली होती.

Advertisement
Tags :

.