For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत बांगलादेशवरील वर्चस्व कायम राखण्यास सिद्ध

06:58 AM Oct 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत बांगलादेशवरील वर्चस्व कायम राखण्यास सिद्ध
Advertisement

आज दुसरी ‘टी-20’ लढत, भारतीय युवा फळी मालिका जिंकण्याच्या तयारीत, पाहुण्यांपुढे पुनरागमनाचे आव्हान

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी ‘टी-20’ लढत आज येथे होणार असून भारताने इतके निर्विवाद वर्चस्व दाखविलेले आहे की, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाचे कौशल्य आणि त्याच्या मानसिकतेला तोंड देणे पाहुण्यांना कठीण गेले आहे. पहिल्या लढतीत भारताच्या युवा खेळाडूंचे आव्हान पाहुण्यांना बरेच जड गेलेले असून आजही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Advertisement

बांगलादेश हा धूर्त प्रतिस्पर्धी असल्याची हवा झालेली असली, तरी तसे ते क्वचितच दिसले असून भारताने मात्र घरच्या मैदानावर नेहमीप्रमाणे आपले वर्चस्व दाखवून दिलेले आहे. त्यामुळे रिषभ पंत, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊनही ग्वाल्हेरमधील सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने सात गडी राखून आरामात विजय मिळवला. रविवारच्या त्या सामन्यात लक्षवेधी ठरलेला एक खेळाडू म्हणजे संजू सॅमसन. या मालिकेसाठी सूर्यकुमारने त्याला सलामीवीराची भूमिका दिलेली आहे.

सॅमसन 2015 मध्ये पदार्पण केल्यापासून कधी राष्ट्रीय संघात, तर कधी बाहेर असा होत राहिला आहे आणि सातत्याचा अभाव हे त्याचे एक प्रमुख कारण ठरले आहे. सहसा मधल्या फळीत फलंदाजीस येणाऱ्या या यष्टिरक्षक फलंदाजाने ग्वाल्हेरमधील लढतीत आपल्या नवीन भूमिकेत आनंदाने वावरताना आणि ‘पॉवरप्ले’मध्ये मुक्तपणे खेळण्याची आपली क्षमता दाखवताना 19 चेंडूंत 29 धावा केल्या. तथापि, तो त्याच्या आश्वासक सुऊवातीचे भरीव डावात रुपांतर करू शकला नाही. ते त्याचा सलामीचा भागीदार अभिषेक शर्माने करून दाखविले. त्याने धावबाद होण्यापूर्वी आपल्या पूर्ण शक्तीचे प्रदर्शन केले.

या मालिकेसाठी प्रथम पसंतीचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांना विश्रांती दिल्याने सॅमसन आणि शर्मा हे दोघेही स्वत:ला सिद्ध करण्यास उत्सुक असतील. ही जोडी येथे संधीचे सोने करून बुधवारी रात्री मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल. पंतच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षक म्हणून आपले स्थान मजबूत करण्याचे लक्ष्यही 29 वर्षीय सॅमसनपुढे असेल. ‘टी-20’ विश्वचषकाला अजून दोन वर्षे बाकी असली, तरी सलामीवीर व यष्टिरक्षक या दोन्ही भूमिकांत सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास सॅमसन भविष्यात मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठीच्या संघात निवडीच्या दृष्टीने प्रबळ दावेदार बनू शकतो.

सलामीच्या सामन्यात सर्व काही भारताला हवे तसे घडलेले असल्याने यजमान त्यांच्या संघरचनेत बदल करण्याची शक्यता नाही. नवोदित मयंक यादवने त्याच्या वेगाच्या जोरावर चकीत केलेले आहे, तर सहकारी नितीशकुमार रे•ाrने सीम बॉलिंग करू शकणारा अष्टपैलू म्हणून ठसा उमटवला आहे. अर्शदीप सिंगने वेगवान माऱ्याचे सक्षमपणे नेतृत्व केले असून फिरकी गोलंदाज वऊण चक्रवर्ती याने तीन वर्षे राष्ट्रीय संघापासून दूर राहिल्यानंतर जोरदार पद्धतीने पुनरागमन केले आहे. रवींद्र जडेजाच्या निवृत्तीने रिक्त झालेल्या फिरकी टाकू शकणाऱ्या अष्टपैलू खेळाडूच्या जागेवर वॉशिंग्टन सुंदरप्रमाणेच त्याची नजर असेल.

दुसरीकडे, तीन सामन्यांच्या मालिकेत आव्हान जिवंत राहायचे असेल, तर पाहुण्यांना त्वरित पुन्हा संघटित व्हावे लागेल. बांगलादेशने या वर्षाच्या सुऊवातीला झालेल्या विश्वचषक स्पर्धेत मैदानात उतरविलेला संघच कमी-अधिक प्रमाणात या मालिकेत उतरविलेला आहे. त्यांच्याकडे खरे तर अनुभवाचा फायदा आहे, परंतु संघ टी-20 प्रकारात छाप उमटवू शकलेला नाही. फलंदाजी हा त्यांचा कमकुवत दुवा कायम राहिलेला आहे आणि भारताच्या शिस्तबद्ध माऱ्याविऊद्ध संघाला संघर्ष करावा लागणे हे आश्चर्यकारक नाही. लिटन दास आणि महमुदुल्लाह यासारख्या वरिष्ठ खेळाडूंना आता चमक दाखवावी लागेल. बांगलादेशच्या गोलंदाजांमध्ये क्षमता असली, तरी भारताच्या मजबूत लाइनअपचा विचार करता त्यांना भरपूर धावांचे आव्हान उभे करावे लागेल.

संघ-भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीशकुमार रे•ाr, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वऊण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव.

बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झिद हसन तमीम, परवेझ हुसेन इमॉन, तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, लिटन कुमेर दास, जाकेर अली अनिक, मेहिदी हसन मिराझ, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, तन्झिम हसन साकिब, रकीबुल हसन.

 सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.

Advertisement
Tags :

.