सुवर्ण साठ्यात भारत नवव्या स्थानी
सऊदी अरब, ब्रिटन यांना टाकले मागे : फोर्ब्सची यादी जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या सुवर्ण साठ्याने सऊदी अरेबिया आणि ब्रिटन या देशांना मागे टाकले आहे. भारताकडे आता सऊदी अरब आणि ब्रिटन या देशानंतर सर्वाधिक सुवर्ण साठा असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. भारत आता टॉप 10 देशांमध्ये सामील झाला आहे. फोर्ब्स यांनी सुवर्ण साठ्यासंबंधीची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार भारताकडे 800.78 टन सुवर्ण साठा आहे. अशाप्रकारे भारत हा आघाडीवरच्या दहा देशांमध्ये नवव्या स्थानावर पोहोचला आहे. सऊदी अरब देशाकडे 323 टन सुवर्ण साठा आहे ते यादीमध्ये सोळाव्या स्थानावर आहेत तर ब्रिटनकडे 310 टन सोने असून ते या यादीत सतराव्या नंबर वर आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार 81336 टन इतका सुवर्ण साठा अमेरिकेकडे असून यादीमध्ये आघाडीचे स्थान राखून आहे. जर्मनी आणि इटली हे दोन देश अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर आहेत. ज्या देशांकडे सुवर्ण साठा अधिक आहे. त्याची आर्थिक स्थिरता ही चांगली असते असे दिसून आलेले आहे. आर्थिक अनिश्चिततेच्या काळामध्ये कोणत्याही देशासाठी सुवर्ण साठा हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. इंटरनॅशनल ट्रेड अँड फायनान्स यांच्यामते डॉलरचे मूल्य जेव्हा घटते, तेव्हा त्याची किंमत ही वाढत असते. त्यामुळे सोने हे साठ्याच्या तुलनेमध्ये पाहता व्यापार आणि वित्त नियोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असते. काही देश व्यापारातील असंतुलन बिघडलेले असेल तर कर्जासाठी सोन्याचा वापर करतात असे दिसून आले आहे. सोने ही संकटाच्या काळामध्ये मदतीला आलेले आहे हे अनेकांना माहिती आहेच.
सुवर्ण साठ्यामध्ये आघाडीवरचे सहा देश
अमेरिका 81,336 टन
जर्मनी 3352 टन
इटली 2451 टन
फ्रान्स 2436 टन
रशिया 2332 टन
चीन 2191 टन