For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आर्थिक विकासात भारत पाचव्या क्रमांकावर

06:22 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
आर्थिक विकासात भारत पाचव्या क्रमांकावर
Advertisement

फीच रेटिंगचा अंदाज :2030 पर्यंत जपानला टाकणार मागे

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

अमेरिका, चीन, जर्मनी, जपाननंतर भारत आता जगातील पाचवा मोठ्या अर्थव्यवस्थेचा देश झाला आहे. 2030 पर्यंत भारत जीडीपीसह जपानला मागे टाकू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे भारत हा आशिया-प्रशांत क्षेत्रामध्ये दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा अर्थव्यवस्थेचा देश बनणार आहे.

Advertisement

फीच या रेटिंग एजन्सीच्या अहवालात वरील माहिती देण्यात आली आहे. ऊर्जा आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या मजबूत मागणीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होताना दिसते आहे. उद्योगांनी गती पकडली असून पायाभूत सुविधांसह विविध साधनसुविधांची सोय विविध शहरांमध्ये होताना दिसत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत.

सिमेंट, ऊर्जा आणि पेट्रोलियम उत्पादनांची मागणी मजबूत असून ती यापुढेही कायम राहणार आहे. 2023 मध्ये यांची मागणी कोरोनापूर्व काळापेक्षा अधिक राहणार आहे. पायाभूत सुविधांवर देण्यात येणारा भर यामुळे मागणीदेखील वाढणार आहे. अमेरिका, चीन, जर्मनी, जपान यांच्यानंतर भारत जगातील पाचव्या मोठ्या नंबरचा अर्थव्यवस्थेतला देश ठरला आहे. 2030 पर्यंत जपानलाही भारत मागे टाकेल असे म्हटले जात आहे. रेटिंग एजन्सीच्या माहितीनुसार आर्थिक वृद्धी वेगाने होत असून कंपन्यांच्या उत्पादनांना आगामी काळामध्ये चांगली मागणी राहणार आहे. विदेशी बाजारात मात्र सध्याला मंदीची छाया दिसत आहे.

. ...यांचेही सकारात्मक अंदाज

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने (आयएमएफ)सुद्धा 2023-24 वर्षाकरिता भारताचा विकास दर 6.30 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.  देशाच्या विकासामध्ये चांगली गती प्राप्त होत असून आर्थिक स्थिरतेमुळे विकास दर वरील प्रमाणे राखता येणे शक्य होणार आहे. डिसेंबर 2023 मध्ये गोल्डमॅन सॅचनेसुद्धा 2024 मध्ये भारताचा विकासदर 13 मोठ्या अर्थव्यवस्थांच्या देशांमध्ये सर्वाधिक 6.2 टक्के इतका राहणार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे एस अँड पी यांनी सुद्धा आर्थिक वर्ष 2024-2026 पर्यंत भारताचा जीडीपी वर्षाच्या आधारावर 6 ते 7.1 टक्के इतका राहणार असल्याचे म्हटले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनेसुद्धा 2023-24 आणि 2024-25 या वर्षाकरिता 6.5 टक्के इतका आर्थिक विकास दर राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Advertisement
Tags :

.