महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रदूषित देशांच्या यादीत भारत आठव्यास्थानी

07:17 AM Mar 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लाहोर ठरले सर्वाधिक प्रदूषित शहर ः दक्षिण आशियात प्रदूषणाचे प्रमाण अधिक

Advertisement

@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

2022 या वर्षामध्ये भारत जगातील  आठव्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रदूषित देश राहिला आहे. 2021 मध्ये याप्रकरणी भारत पाचव्या स्थानावर होता. हवा प्रदूषणाचे मोजमाप होणाऱया पीएम2.5 मध्ये देखील घसरण झाली आहे. हे प्रमाण आता 53.3 मायक्रोग्रॅम/क्यूबिक मीटर इतके झाले आहे. परंतु चिंतेची बाब म्हणजे हे प्रमाण अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून घोषित सुरक्षित प्रमाणापेक्षा 10 पट अधिक आहे.

हवा प्रदूषणाचे अध्ययन करणारी स्वीस यंत्रणा आयक्यू एअरने मंगळवारी जागतिक हवा गुणवत्ता अहवाल जारी केला आहे. यात 131 देशांचा डाटा 30 हजारांहून अधिक ग्राउंड बेस मॉनिटरांकडून प्राप्त करण्यात आला आहे. या अहवालात जगातील सर्वाधिक प्रदूषित 20 शहरांपैकी 19 शहरे आशियातील आहेत. यातील 14 शहरे ही भारतातील आहेत. तर एक शहर आफ्रिकेतील आहे.

आतापर्यंत दिल्ली ही जगातील सर्वात अधिक प्रदूषित राजधानी होती, परंतु यंदा आयक्यू एअरने दिल्लीचे दोन हिस्स्यांमध्ये सर्वेक्षण केले. सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्ली चौथ्या तर नवी दिल्ली 9 व्या स्थानावर आहे. 8 व्या स्थानावर आफ्रिकन देश चाडची राजधानी अनजामेना आहे. 

दिल्ली प्रदूषित, एनसीआरमध्ये सुधारणा

दिल्लीसोबत एनसीआरमध्ये सामील गुरुग्राम, नोएडा, गाजियाबाद आणि फरिदाबादमध्ये प्रदूषणाच्या पातळीत घट झाली आहे. सरासरी पीएम 2.5 च्या तुलनेत गुरुग्राममध्ये 34 टक्के, फरिदाबादमध्ये 21 टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली आहे. दिल्लीत 8 टक्केच सुधारणा झाली आहे. परंतु या शहरांमध्ये प्रदूषण अद्याप अत्यंत अधिक आहे. या प्रदूषणामुळे लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे. भारतात वायू प्रदूषणाची समस्या उत्तर भारतात तुलनेत अधिक आहे. यात राजस्थान, दिल्ली, हरियाणा, बिहार, उत्तरप्रदेशमध्ये ही समस्या विक्राळ होत चालली आहे.

दक्षिण आशियात समस्या तीव्र

सर्वाधिक प्रदूषित 100 शहरांपैकी 72 शहरे ही दक्षिण आशियातील आहेत. यातील बहुतांश शहरे भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातील आहेत. या अहवालाच्या आधारावर दक्षिण आशियाला हवा प्रदूषणाचे केंद्र ठरविण्यात आले आहे. या अहवालाच्या आधारावर जागतिक बँकेने प्रदूषण कमी करण्यासाठी येणाऱया खर्चाचे विश्लेषण केले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी 2.6 अब्ज डॉलर्स खर्च करावे लागणार आहेत.

पाकिस्तानात प्रदूषण वाढले

पाकिस्तानातील लाहोर हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. याचबरोबर पेशावर हे शहर याप्रकरणी 5 व्या स्थानावर आहे. फैसलाबाद हे शहर या यादीत 16 व्या स्थानावर आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article