For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

विंडीजवर आघाडी वाढवण्यास भारत सज्ज

06:05 AM Oct 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
विंडीजवर आघाडी वाढवण्यास भारत सज्ज
Advertisement

सॅमसनवरच विश्वास ठेवायचा की, सूर्यवंशीला खेळवायचे हा पेच पुन्हा एकदा उभा, वेगवान गोलंदाजी जोडीत बदल होण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/रांची

दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय फलंदाजी फळीत संजू सॅमसनचा खराब फॉर्म ही एकमेव चिंतेची बाब ठरत आहे. यामुळेच आज शुक्रवारी येथे होणाऱ्या वेस्ट इंडिजविऊद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मासोबत युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला जोडीदार म्हणून उतरवण्याबाबत संघ व्यवस्थापन विचार करू शकते. येथील विजयामुळे भारताला पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळेल, परंतु यजमान संघाला सॅमसनकडून अधिक प्रभावी कामगिरीची अपेक्षा नक्कीच असेल. केरळच्या या फलंदाजाच्या मागील चार डावांमधील धावा 9, 7, 2 आणि 11 अशा आहेत. परिणामी मागील चार सामन्यांत सॅमसनच्या भागीदारीची स्थिती 7, 12, 2 (दोन्ही वेळा दुसऱ्या यष्टीसाठी, कारण त्यावेळी सूर्यवंशी सलामीला आला होता) आणि 29. मात्र कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील मधल्या फळीने या अपयशाची भरपाई अत्यंत प्रभावीपणे केली आहे. अय्यरने आपल्या कारकिर्दीतील 68 व्या सामन्यात पहिले टी-20 शतकही झळकावले.

Advertisement

त्यामुळे सूर्यवंशीला आणखी एक संधी देण्याचा विचार होऊ शकतो. आतापर्यंत मिळालेल्या मर्यादित संधींमध्ये या डावखुऱ्या फलंदाजाने दाखवून दिले आहे की, टी-20 क्रिकेट त्याच्यासाठी अगदी नैसर्गिक आहे. त्याच्याकडे असलेल्या विविध आणि अनोख्या फटक्यांची शैली तसेच सामना जिंकवून देणारे डाव खेळण्याची क्षमता यामुळे तो एक अत्यंत प्रभावी खेळाडू ठरला आहे. परंतु भारताने आतापर्यंत अभिषेक आणि सॅमसन या प्रस्थापित सलामी जोडीवरच विश्वास दाखवला आहे. जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर खेळवून सलामीची जागा सूर्यवंशीला दिली गेली तेव्हाही व्यवस्थापनाचा

सॅमसनला असलेला पाठिंबा स्पष्ट दिसून आला होता. तरीही दाखवलेल्या या विश्वासाला साजेशी कामगिरी करण्यात सॅमसनला अद्याप यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर कॅरिबियन संघाविऊद्धची ही पाच सामन्यांची मालिका सॅमसनसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. कारण केवळ विश्वचषकातील कामगिरीच्या जोरावर तो फार काळ आपले स्थान टिकवून ठेवू शकणार नाही. पण प्रचंड गुणवत्ता असूनही सूर्यवंशीला हे उमजले आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे एक पूर्णपणे वेगळे आव्हान आहे.

इंग्लंडविऊद्धच्या टी-20 मालिकेत भारताचा 0-3 असा पराभव झाला. त्यात त्याने 14, 13 आणि 15 धावा केल्या. आशियाई क्रीडा स्पर्धेत बिहारच्या या फलंदाजाची धावसंख्या 18 आणि 35 अशी होती. नवोदित खेळाडूसाठी या धावा वाईट नाहीत, पण त्यातून हेही स्पष्ट झाले की, केवळ मिळालेल्या प्रसिद्धीमुळे त्याला घाईघाईने उच्चस्तरीय क्रिकेटमध्ये आणता येणार नाही. त्यामुळे या 15 वर्षीय खेळाडूला आणखी एक संधी देण्यापूर्वी भारतीय संघ व्यवस्थापन सर्व पैलूंचा गांभीर्याने विचार करेल. परिणामी शुक्रवारचा सामना हा

सॅमसन की सूर्यवंशी, या प्ऱश्नावर अधिक केंद्रीत असेल. मालिका जसजशी पुढे जाईल तसतसा हा प्रश्न अधिक जोर धरू शकतो. भारत वेगवान गोलंदाजीच्या जोडीत बदल करण्याचाही विचार करेल. पहिल्या टी-20 सामन्याच्या सुऊवातीच्या षटकात मयंक यादवने 16 धावा दिल्या आणि मधल्या तसेच अंतिम षटकांतही तो महागडा ठरला. तरीही त्याने 19 व्या षटकात विंडीजचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज शेरफेन रदरफोर्डचा महत्त्वाचा बळी घेतला.

अष्टपैलू नितीशकुमार रे•ाrला संघात आणून त्याच्याकडे नवीन चेंडू सोपवण्याचा विचार भारत करू शकतो. मात्र याआधीच्या वनडे मालिकेत हा प्रयोग फारसा यशस्वी ठरला नव्हता. दुसरीकडे, अनुभवी अक्षर पटेलच्या जोडीला कुलदीप यादव आल्यानंतर फिरकी गोलंदाजीची बाजू स्थिरावलेली दिसली. या जोडीने प्रत्येकी दोन बळी घेतले आणि विंडीजच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. नवोदित अष्टपैलू नमन धीर ही आणखी एक सकारात्मक बाब ठरली आहे. त्याने आपल्या ऑफस्पिन गोलंदाजीने 3 बळी घेत प्रभावी कामगिरी केली. वेस्ट इंडीजच्या बाबतीत सांगायचे तर, पहिल्या सामन्यात 171 धावांत सर्व बाद झाल्यानंतर त्यांना आता त्यापेक्षा खूप मोठी धावसंख्या उभारावी लागेल. त्यांच्या संघात टी-20 मधील अनेक प्रस्थापित खेळाडूंचा समावेश आहे. कर्णधार शाई होपच्या सोबतीला शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोस्टन चेस आणि रोमारियो शेफर्ड यांच्यासारखे आक्रमक फलंदाज आहेत.

संघ

भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, ईशान किशन, नमन धीर, कुलदीप यादव, नितीशकुमार रे•ाr, अक्षर पटेल, प्रिन्स यादव, रवी बिश्नोई, संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी, मयंक यादव.

वेस्ट इंडिज : शाय होप (कर्णधार), ज्वेल अँड्य्रू, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, अकील होसेन, शामर जोसेफ, गुडाकेश मोती, कीमो पॉल, कामिल पूरन, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, क्वेंटिन सॅमसन, रोमारियो शेफर्ड, शामार स्प्रिंगर.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7 वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ हॉटस्टार

Advertisement
Tags :

.