For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-फिलिपिन्स फुटबॉल सामने गोव्यात

06:44 AM Aug 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत फिलिपिन्स फुटबॉल सामने गोव्यात
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

2027 मध्ये होणाऱ्या 17 वर्षाखालील वयोगटातील एएफसी महिलांच्या आशिया चषक पात्र फेरी स्पर्धेसाठी आतापासूनच अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने सरावाच्या दृष्टिकोनातून मित्रत्वाचे सामने आयोजित करण्यावर भर दिला आहे. आता भारत आणि फिलिपिन्स महिला संघामध्ये दोन मित्रत्वाचे फुटबॉल सामने गोव्यामध्ये 26 आणि 29 सप्टेंबर रोजी खेळविले जातील. मात्र या सामन्यांची ठिकाणे नंतर जाहीर केली जातील.

17 वर्षाखालील वयोगटामध्ये भारत आणि फिलिपिन्स महिला फुटबॉल संघात ही दुसऱ्यांदा गाठ पडत आहे. सध्या भारतीय महिला फुटबॉल संघ उझबेकमध्ये दोन सरावाचे सामने खेळण्यासाठी गेला आहे. यापैकी पहिला सामना गुरुवारी गोलशून्य बरोबरीत राहिला होता. तर या दौऱ्यातील दुसरा सामना रविवारी खेळविला जाईल. आगामी एएफसी महिलांच्या आशिया चषक पात्र फेरीच्या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना इराकबरोबर 5 ऑक्टोबरला तर सिरियाबरोबर 8 ऑक्टोबरला आणि यजमान मलेशियाबरोबर 11 ऑक्टोबरला होणार आहे. सदर पात्र फेरीची स्पर्धा मलेशियामध्ये खेळविली जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.