For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-पाक महिला लढत 5 सप्टेंबरला

06:47 AM Aug 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत पाक महिला लढत 5 सप्टेंबरला
Advertisement

वृत्तसंस्था, दुबई

Advertisement

येथे सुरु झालेल्या महिलांच्या टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक संघातील महत्त्वाचा सामना 5 सप्टेंबरला खेळविला जाईल. मात्र या सामन्यासाठी भारतीय संघ दर्जेदार खेळ करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करत असल्याची प्रतिक्रिया कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केली आहे.

महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत, पाकिस्तान, विद्यमान विजेता श्रीलंका, बांगलादेश, यजमान यूएई, थायलंड, हाँगकाँग, चीन आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली असून आता हा संघ दुबईमधील या स्पर्धेत संभाव्य विजेता म्हणून ओळखला जातो.

Advertisement

सदर स्पर्धेत सहभागी झालेला प्रत्येक संघ हा दर्जेदारच असतो. कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. या स्पर्धेकरीता भारतीय संघाने आपल्या सरावावर अधिक भर दिला आहे. प्रतिस्पर्धी संघाकडून आम्हाला कडवे आव्हान या स्पर्धेत मिळू शकेल. येथील हवामान आणि वातावरण याच्याशी समरस होताना आम्हाला थोडा कालावधी लागत आहे. पण क्रिकेटचा आनंद पुरेपूर लुटण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज झाला आहे. अलिकडच्या कालावधीत झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाची कामगिरी निकृष्ट झाल्याने आम्हाला दुबईतील या स्पर्धेवर चांगली कामगिरी करण्यासाठी लक्ष द्यावे लागेल, असे कर्णधार हरमनप्रीत कौरने म्हटले आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकचे नेतृत्व सना फातिमाकडे सोपविण्यात आले आहे. आता क्रिकेट शौकीन 5 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या लढतीची वाट पाहत आहेत

Advertisement
Tags :

.