कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur : युद्धजन्य परिस्थितीचा पर्यटनावर परिणाम, जिल्ह्यात कडक सुरक्षा

11:44 AM May 11, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

विमानतळावरील उडाणे तात्पुरती रद्द केली आहेत.

Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

भारत -पाकिस्तान या दोन देशामधील निर्माण झालेल्या तणावाचा फटका देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनावर झाला आहे. तर कोल्हापूरातील पर्यटनही रोडावले आहे. युध्दजन्य परिस्थितीमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पर्यटक आपले बुकिंग रद्द करत आहेत. शालेय सुट्टीनंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन बहरते. पण यंदा ऐन पर्यटनाच्या हंगामात भारत-पाकिस्तान या दोन देशामध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा मोठा फटका पर्यटनाला बसला आहे.

विमानतळावरील उडाणे तात्पुरती रद्द केली आहेत. यामुळे पर्यटकांनी 80 टक्के बुकिंग रद्द केले असून 3 ते 3.5 कोटी रुपयांची तिकिटे रद्द झाली आहेत असे टूर ऑपरेटर कंपन्यांकडून सांगण्यात आले. पंधरा दिवसापूर्वी काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पर्यटक मारले गेले. त्यानंतर भारताकडून जोरदार कारवाई सुरु झाली आहे.

दहशतवादी तळावर हल्ला करुन ते उद्ध्वस्त करण्यात येत आहेत. यामुळे सद्या युध्दजन्य परिस्थिती आहे. यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्यास सुरु केल्यापासून उत्तर भारतातील सहलींचे बुकिंग रद्द करण्यात आले आहे. परिस्थिती लवकर सावरावी, अशी आशा पर्यटकांतून व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील पर्यटकांची संख्या रोडावलीसुट्या सुरु झाल्यामुळे कोल्हापुरात पर्यटकांची संख्या वाढते.

गेल्या आठवड्यापासून कोल्हापूरच्या पर्यटनावर परिणाम झाला आहे. युध्दजन्य परिस्थितीमुळे अचानक काहीही घडू शकते या शक्यतेने काहींनी घरीच थांबणे पसंद केले आहे. यामुळे कोल्हापूरातील पर्यटकांची संख्या रोडावली आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार अशी सलग तीन दिवस शासकीय सुटी असूनही शनिवारी शहरात फारसी गर्दी नव्हती.

पहलगाममधील हल्ला, भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेला तणाव अशा परिस्थितीत भाविकांची गर्दी डोळ्यासमोर ठेवून अंबाबाई मंदिर व परिसरात तैनात पोलिसांना सर्तक राहण्याची सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मंदिराची सुरक्षा कडक असून शीघ्रकृती दलाने मंदिरासभोवती गस्त वाढवली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी झालेला पहलगाम हल्ला आणि भारत-पाकिस्तानमध्ये तयार झालेली युद्धजन्य परिस्थिती, उन्हाळी सुट्टीमुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यातून अंबाबाईच्या दर्शनासाठी येणारे भाविक या पार्श्वभूमीवर मंदिराभोवतीने तैनात पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सध्या युध्द विराम घेतला असला तरी मंदिरा भोवतीची सुरक्षा कडक होती.

पर्यटन नंतर...पहलगाम येथील दहशतवादी हल्ला झाल्यापासून पर्यटनावर परिणाम झाला आहे. आता तरी थेट भारत - पाकिस्तान असे युध्दाची परिस्थिती आहे. हवाई, ड्रोन हल्ले होत आहेत. केंद्र सरकारने देशातील बहुतांश विमानांची उडाणे रद्द केली आहेत. यामुळे पर्यटनावर आणखी परिणाम होत आहे.

यापूर्वी बुकिंग केलेल्या पर्यटकांकडून सहली रद्द केल्या जात आहेत. काही पर्यटक युध्दाचे वातावरण शांत झाल्यावर सहलीचे ठरवू अशी भूमिका घेत आहेत. कोल्हापूरातील पर्यटनावरही याचा मोठा परिणाम झाला आहे. - बाळासाहेब वराडे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा टॅव्हल असोसिएशन.

Advertisement
Tags :
#ambabai_mandir#kolhapur tourism#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaIndia Pakisatan warOperation Sindoor
Next Article