For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुवर्णपदकासाठी आज भारत-पाक लढत

06:45 AM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
सुवर्णपदकासाठी आज भारत पाक लढत
India-Pakistan clash for the gold medal today.
Advertisement

वृत्तसंस्था, नागोया : विश्वविजेता भारत संघातल्या अनेक मोठ्या टी-20 स्टार्ससह आज शनिवारी आशियाई खेळांतील पुऊष क्रिकेट स्पर्धेतील राजकीयदृष्ट्या सर्वांत तणावपूर्ण असलेल्या अंतिम सामन्यात आपले कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानला मैदानावर आणि मैदानाबाहेर एक कडक संदेश देण्यास उत्सुक असेल.

Advertisement

केवळ दोन सामने जिंकून एखादा संघ सुवर्णपदक जिंकतो असे सहसा घडत नाही, परंतु सततच्या पावसामुळे हे घडलेले असूँन भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी आपापल्या उपांत्य फेरीत सहज विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतरिम मुख्य प्रशिक्षक व्ही. व्ही. एस लक्ष्मण आणि नवीन टी20 कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यासाठी साहिबजादा फरहानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या दुय्यम संघाविऊद्धचा अंतिम सामना हा जराही कठीण नाही. पण बेसावध राहून चालणार नसून एक छोटीशी चूकही मोठी नामुष्की मानली जाईल. कारण भारताने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह आपला पहिला संघ पाठवलेला आहे.

म्हणूनच लक्ष्मण आणि अय्यर यांना माहित आहे की, सुवर्णपदकाने त्यांना फारशी प्रशंसा मिळणार नाही, पण एका तऊण पाकिस्तानी संघाविऊद्ध रौप्यपदकावर समाधान मानण्याचा प्रसंग आल्यास ते स्वीकारार्ह ठरणार नाही. पाकिस्तानच्या संघात ‘पीएसएल’मधील काही दर्जेदार खेळाडू आहेत, पण जुन्या काळातील क्रिकेट संघांप्रमाणे स्टार खेळाडूंची स्पष्टपणे कमतरता आहे. तरीही, साहिबजादा, माझ सदाकत, हसन नवाझ, साईम अयुब आणि अराफत मिन्हास यांच्यासारखे खेळाडू चांगली टक्कर देऊ शकतात. कारण निशिन शहरातील कोरोगी पार्कच्या खेळपट्टीच्या स्वरूपामुळे दोन्ही संघांमधील फरक कमी झाला आहे.

Advertisement

खेळपट्टीवर चेंडू असमान उसळत आहे आणि त्याला चांगली वळण मिळत आहे. त्यामुळे अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई यांच्यासोबतच दिग्गज बुमराहची भूमिका अधिक महत्त्वाची ठरेल. जर खेळपट्टीवर चेंडूला लक्षणीय वळण मिळाले, तर अभिषेक शर्माचीही भूमिका महत्त्वाची असेल. दुसऱ्या बाजूला, पाकिस्तान आपले दोन मनगटी फिरकी गोलंदाज अबरार अहमद व सुफियान मोकीम यांच्यासोबतच फिरकी गोलंदाज साईम आणि अराफत यांच्यावर अवलंबून असेल. दोन्ही संघांचे फिरकी गोलंदाज जी 16 षटकं टाकतील त्यातच सामन्याचा जय-पराजय ठरेल.

फलंदाजीच्या बाबतीत अभिषेक, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, उपांत्य फेरीचा नायक इशान किशन, आशिया कप फायनलचा स्टार खेळाडू तिलक वर्मा आणि शिवम दुबे हे भारताचा किल्ला लढवतील. त्या तुलनेत पाकिस्तानची फलंदाजी मोठ्या प्रमाणावर कर्णधार साहिबजादावर अवलंबून आहे. साईम हा पाकिस्तानमधील एक उच्च दर्जाचा तऊण खेळाडू आहे, पण त्याने भारताविऊद्ध विशेष काही कामगिरी केलेली नाही. मात्र, हसन नवाझ आणि अब्दुल समद हे असे खेळाडू आहेत. ज्यांच्यावर पाकिस्तान अवलंबून राहू शकतो,

संघ: भारत: श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, विपराज निगम, यश ठाकूर, अर्शदीप सिंग.

पाकिस्तान : साहिबजादा फरहान (कर्णधार), सैम अयुब, माझ सदाकत, उस्मान खान, हसन नवाज, अब्दुल समद, अराफत मिन्हास, मोहम्मद वसीम, अहमद दानियाल, सुफियान मोकीम, अबरार अहमद, अकिफ जावेद, अली रझा, साद मसूद, हैदर अली.

सामन्याची वेळ : सकाळी 10:30 वा.

थेट प्रक्षेपण : सोनी लिव्हवर

Advertisement
Tags :

.