महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारत-पाक डेव्हिस लढत आजपासून

06:22 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

Advertisement

यजमान पाकिस्तान आणि भारत यांच्यातील ऐतिहासिक डेव्हिस चषक विश्व गट 1 प्ले ऑफ लढतीला येथे शनिवारपासून प्रारंभ होत आहे. या लढतीसाठी भारतीय संघामध्ये अनेक अव्वल खेळाडूंची उणीव भासणार आहे. तथापि या लढती भारताकडेच फेवरिट म्हणून पाहिले जाते.

Advertisement

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत भारताने एकदाही पाककडून हार पत्करलेली नाही. दरम्यान उभय देशात आतापर्यंत सातवेळा लढती झाल्या असून भारताने त्या सर्व जिंकल्या आहेत. या लढतीमध्ये पाक संघाकडून ऐसाम उल कुरेशी आणि अकिल खान यांच्याकडून भारतीय संघाला कडवा प्रतिकार अपेक्षीत आहे. उभय देशातील ही लढत ग्रासकोर्टवर खेळवली जाणार आहे. ग्रासकोर्टवर कुरेशी आणि अकिल खान यांची आतापर्यंतची कामगिरी दर्जेदार झाली आहे. इस्लामाबादच्या या टेनिस कोर्टवर वेगवान सर्विस करणाऱ्या टेनिसपटूला अधिक फायदा होईल.

या लढतीमध्ये शनिवारी दि. 3 फेब्रुवारी रोजी पहिला एकेरी सामना रामकुमार रामनाथन व ऐसाम उल हक कुरेशी यांच्यात खेळवला जाईल. त्यानंतर दुसरा एकेरी सामना श्रीराम बालाजी आणि अकिल खान यांच्यात होईल. रविवार 4 फेब्रुवारी रोजी दुहेरीचा सामना होणार आहे. युकी भांब्री व साकेत मिनेनी यांची लढत पाकच्या बरकतुल्ला आणि मुर्तझा यांच्यात ही लढत चुरशीची होईल. या दुहेरीच्या सामन्यानंतर परतीचा एकेरी सामना रामकुमार रामनाथन व अकिल खान यांच्यात तसेच परतीचा दुसरा आणि शेवटचा एकेरी सामना ऐसाम उल हक कुरेशी व श्रीराम बालाजी यांच्यात खेळवला जाईल. उभय संघातील ही लढत दोन दिवसात संपणार आहे. या लढतीसाठी भारतीय डेव्हिस संघाचे नेतृत्व झिशान अलीकडे सोपवण्यात आले असून तो बहिस्थ कर्णधार राहणार आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article