भारत हाँगकाँगला मागे टाकत चौथ्या स्थानावर
06:43 AM Jan 24, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
भारतीय शेअर बाजाराच्या भांडवल मूल्याने हाँगकाँग शेअर बाजाराला मागे टाकत चौथे स्थान प्राप्त केले आहे. भारतीय शेअर बाजाराने पहिल्यांदाच अशी कामगिरी केलेली आहे. गुंतवणुकदारांसाठी पोषक वातावरण शेअर बाजारामध्ये पहायला मिळाले.
Advertisement
भारतीय शेअर बाजाराला तेजी राखण्यासाठी सरकारची धोरणेही कारणीभूत ठरली आहेत. भारतीय शेअर बाजाराचे भांडवल मूल्य 4.33 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले होते. या तुलनेमध्ये हाँगकाँग शेअर बाजाराचे भांडवल मूल्य 4.29 ट्रिलियन डॉलर इतके राहिले होते. ब्लूमबर्ग यांनी ही माहिती दिली आहे. जागतिक स्तरावर पाहता शेअर बाजारात अधिक भांडवल जमा करण्यात भारत चौथ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. 5 डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजाराचे भांडवल मूल्य 4 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले होते.
Advertisement
Next Article