For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत वंशीय लेखिकेला फ्रान्सचा मानाचा सन्मान

06:24 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत वंशीय लेखिकेला फ्रान्सचा मानाचा सन्मान
Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

भारतीय वंशाच्या लेखिका पूजा नॅन्सी आणि आणखी एक व्यक्ती इव्हान हेंग यांना सिंगापूर आणि फ्रान्स यांच्यातील सांस्कृतिक सहकार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल फ्रेंच संस्कृती मंत्रालयाने नाइट्स ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले आहे. सिंगापूरमधील फ्रान्सचे राजदूत मिन्ह-डी टांग यांनी सिंगापूरचे मंत्री एडविन टोंग यांच्या उपस्थितीत नॅन्सी आणि हेंग यांना हा पुरस्कार प्रदान केला. नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हा फ्रेंच संस्कृती मंत्रालयाने स्थापित केलेला सर्वोच्च सन्मान आहे. कला, साहित्य किंवा या क्षेत्रांच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.

Advertisement
Advertisement
Tags :

.