भारत-न्यूझीलंड निर्णायक सामना आज
वृत्तसंस्था/अहमदाबाद
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील येथे मंगळवारी यजमान भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघातील तिसरा आणि निर्णायक सामना खेळविला जाणार आहे. दोन्ही संघातील प्रत्येकी एक सामना जिंकून बरोबरी साधल्याने मंगळवारच्या सामन्याला रंगत येणार आहे. मात्र मालिका विजयासाठी भारतीय महिला क्रिकेटपटूंना सर्वच विभागात दर्जेदार कामगिरीची गरज राहिल.
या मालिकेतील भारताची फलंदाजी म्हणावी तशी समाधानकारक झालेली नाही. स्मृती मानधना फलांदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. शुक्रवारच्या या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने दिलेले 260 धावांचे आव्हान भारताला पेलवले नाही आणि भारताचा डाव 183 धावांत आटोपल्याने न्यूझीलंडने यामालिकेत बरोबरीची संधी साधली. भारतीय संघातील नवोदित खेळाडू राधा यादव आणि सईमा ठाकुर यांची कामगिरी समाधानकारक झाली. या जोडीने नवव्या गड्यासाठी 70 धावांची भागिदारी दुसऱ्या सामन्यात केली होती. शेफाली वर्मा, कर्णधार हरमनप्रित कौर, स्मृती मानधना, रॉड्रिग्ज, दिप्ती शर्मा, तेजल हसबनीस यांच्यावर फलंदाजीची बिस्त राहिल. शुक्रवारच्या दुसऱ्या सामन्यात मानधनाला खातेही उघडता आले नव्हते. फलंदाजीच्या तुलनेत गोलंदाजीमध्ये भारतीय गोलंदाजांची कामगिरी थोडीफार समाधानकारक झाले असले जाणवते. न्यूझीलंड संघाला अॅमेलिया केरची उणिव निश्चितच भासत असली तरी जेस केर, कर्णधार डिव्हाईन, तेहुहु यांनी चांगली कामगिरी केल्याने न्यूझीलंडला दुसरा सामना जिंकता आला. डावखुरी फिरकी गोलंदाज राधा यादवच्या कामगिरीवर अधिक लक्ष राहिल. या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल.
भारत-हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना, रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दिप्ती शर्मा, रिचा घोष, पूजा वस्त्रकर, रेणूकासिंग रजपूत, राधा यादव, मेघना सिंग, देवीका वैद्य, अमनज्योत कौर, अंजली सर्वानी, सानिया भाटिया आणि यास्तिका भाटिया.
न्यूझीलंड-सोफी डिव्हाईन (कर्णधार), बेटस्, मॅडी ग्रीन, लॉरेन डाऊन, हॅलिडे, मार्टिन, जेनसेन, जेस केर, जोनास, रोवे, पेनफोल्ड, तेहुहू, गेझ आणि प्लिमेर