भारत- म्यानमार सीमेवर कुंपण होणार कुंपण; मुक्त संचार व्यवस्था रद्द; केंद्रिय मंत्री अमित शहा यांचा खुलासा
भारताच्या सीमेला लागून असलेल्या म्यानमारच्या सिमेवर कुंपण घातले जाणार असून दोन्ही देशांमधील सद्याची मुक्त संचार करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे.
याबाबतची माहीती देताना केंद्रिय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "भारत आणि म्यानमार सिमेवर कुंपण घालण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे भारत- म्यानमार या देशांमध्ये लोकांच्या मुक्त संचारावर निर्बंध असणार आहे. मेघालय आणि आसामच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी शनिवारी आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी आसाममधील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला.
नव्याने स्थापन झालेल्या आसाम पोलीस कमांडो बटालियनच्या पहिल्या तुकडीच्या पासिंग आऊट परेडला संबोधित करताना ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ज्यापद्धतीने बांगलादेश आणि भारताच्या सीमेवर कुंपण घातले गेले आहे त्याच पद्धतीने संपूर्ण भारत- म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याचा निर्णय घेतला आहे.”
भारत आणि म्यानमारमध्ये ईशान्येकडील चार राज्यांमध्ये- मिझोराम, नागालँड, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये 1643 किमी लांबीची सीमा आहे. या दरम्यान सीमावर्ती भागात राहणार्या लोकांना व्हिसा न घेता इतर देशांतर्गत 16 किमी पर्यंत प्रवास करण्याची परवानगी असते.