For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत उपांत्य फेरीपासून वंचित

06:43 AM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत उपांत्य फेरीपासून वंचित
Advertisement

वृत्तसंस्था, अॅमस्टेलव्हेन

Advertisement

2026 मधील येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्व चषक हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळविण्याचे भारताचे स्वप्न भंगले. या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने भारताचा 5-3 अशा गोलफरकाने पराभव केला.

आता या स्पर्धेत भारताला खालच्या स्थानासाठीच्या सामन्यात खेळावे लागेल. अर्जैंटिनाबरोबरचा सामना होण्यापूर्वी भारतीय पुरुष हॉकी संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्याची किंचित आशा वाटत होती. पण इ गटातील झालेल्या सामन्यातील पराभवाने भारताचे उपांत्य फेरीसाठीचे आव्हान संपुष्टात आले. या गटातून अर्जेंटिनाने इंग्लंडवर विजय मिळवून उपांत्य फेरीसाठीचे आपले आव्हान जिवंत राखले आहे. या स्पर्धेत भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी अर्जेंटिनाबरोबरचा सामना किमान 3 गोलांच्या फरकाने जिंकणे जरुरीचे होते. पण पहिल्या सहा मिनिटांच्या कालावधीतच अर्जेंटिनाने दोन गोल करून भारतावर आघाडी मिळविली.  खेळाला प्रारंभ झाल्यानंतर 39 व्या सेकंदातच अर्जेंटिनाने आपले खाते उघडले. अर्जेटिनाचा हा पहिला गोल जॅक्विन टोस्केनीने केला. सहाव्या मिनिटाला निकोलास टोरेने अर्जेटिनाचा दुसरा गोल नोंदविला. टॉमस डोमेनीने 33 व्या आणि 45 व्या मिनिटाला असे अर्जेंटिनातर्फे आणखी दोन गोल केले. 53 व्या मिनिटाला लुकास टोस्केनीने अर्जेटिनाचा पाचवा गोल करून भारताचे आव्हान संपुष्टात आणले. या सामन्यात भारतातर्फे सुखजीत सिंगने दहाव्या आणि 58 व्या मिनिटाला असे दोन गोल तर हार्दिक सिंगने 59 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर भारताचा तिसरा गोल केला. या पराभवामुळे भारतीय संघाला इ गटातून दुसऱ्या फेरीत तीन सामन्यांत एकही गुण मिळविता आला नाही. त्यामुळे भारतीय संघ आता या स्पर्धेत सातव्या आणि आठव्या स्थानासाठी खेळेल.

Advertisement

यजमान नेदरलँड्स या स्पर्धेत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. आता इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यातील या गटातील शेवटचा सामना होणार असून त्यानंतर दुसरा उपांत्य फेरीचा संघ निश्चित होईल.

Advertisement
Tags :

.