प्रो लीगसाठी भारताचा पुरुष हॉकी संघ जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एफआयएच प्रो लीग हॉकीच्या युरोप टप्प्यासाठी भारताच्या 24 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली असून हरमनप्रीत सिंगकडे या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे तर हार्दिक सिंग उपकर्णधार असेल. 22 मे पासून याची सुरुवात होणार आहे.
भारतीय संघ एकूण आठ सामने खेळणार असून अर्जेन्टिना, बेल्जियम, जर्मनी, ग्रेट ब्रिटन यांच्याविरुद्ध दोन टप्प्यात प्रत्येकी दोन सामने खेळणार आहे. पहिला टप्पा बेल्जियममधील अँटवर्प येथे 22 ते 30 मे या कालावधीत होईल तर दुसरा टप्पा लंडन येथे 1 ते 12 जून या कालावधीत खेळविला जाईल. 26 जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होणार असून त्याआधी भारतासाठी ही रंगीत तालीम असणार आहे. प्रमुख प्रशिक्षक व्रेग फुल्टनही संघ निश्चित करण्यासाठी या संधीचा उपयोग करून घेतील.
प्रो लीगसाठी निवडण्यात आलेला भारतीय हॉकी संघ : गोलरक्षक-पीआर श्रीजेश, कृशन बहादुर पाठक. बचावपटू-जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, सुमित, संजय, जुगराज सिंग, विष्णुकांत सिंग. मध्यफळी-विवेक सागर प्रसाद, निलकांता शर्मा, मनप्रीत सिंग, शमशेर सिंग, हार्दिक सिंग, राजकुमार पाल, मोहम्मद राहील मौसीन. आघाडी फळी-मनदीप सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, गुर्जंत सिंग, आकाशदीप सिंग, अरायजीत सिंग हुंदाल, बॉबी सिंग धामी.