इंडिया मास्टर्स उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ रायपूर
2025 च्या इंटरनॅशनल मास्टर्स लीग वयस्करांच्या क्रिकेट स्पर्धेत यजमान इंडिया मास्टर्स संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविताना विंडीज मास्टर्स संघाचा 7 धावांनी पराभव केला. या सामन्यात इंडिया मास्टर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 3 बाद 253 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीज मास्टर्सने 50 षटकात 6 बाद 246 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 7 धावांनी गमवावा लागला.
इंडिया मास्टर्सच्या डावामध्ये अंबाती रायडू आणि सौरभ तिवारी यांनी शानदार अर्धशतके झळकाविली. रायडूने 63 तर तिवारीने 60 धावा जमविल्या. विंडीज मास्टर्सच्या डावामध्ये ड्वेन स्मिथने तसेच विलियम्सनने शानदार अर्धशतके नोंदविताना सलामीच्या गड्यासाठी 121 धावांची शतकी भागिदारी केली. स्मिथने 79 तर परकिन्सने 52 धावा केल्या. त्यानंतर बिन्नीच्या अचूक गोलंदाजीमुळे विंडीजला हे उद्दिष्ट गाठता आले नाही. बिन्नीने 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक - इंडिया मास्टर्स 50 षटकात 3 बाद 253 (अंबाती रायडू 63, सौरभ तिवारी 60), विंडीज मास्टर्स 50 षटकात 6 बाद 246 (स्मिथ 79, परकिन्स 52, स्टुअर्ट बिन्नी 3 बळी).