For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताची दमदार सुरुवात

06:18 AM Jul 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताची दमदार सुरुवात
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

प्राथमिक फेरीत खेळताना, ‘वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप‘मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या चंद्रिकाने मुलींच्या 51 किलो वजनी गटात मंगोलियाच्या लखम त्सेंदबातारचा पराभव करत 5-0 असा एकमताने विजय मिळवला. त्यानंतर, ‘वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप‘मधील रौप्यपदक विजेत्या जॉयश्रीनेही तितकेच प्रभावी प्रदर्शन केले; तिने मुलींच्या 54 किलो वजनी गटात चायनीज तैपेईच्या चेन निंग होंगविरुद्ध दुसऱ्या फेरीत ‘रेफरी स्टॉप्ड कॉन्टेस्टद्वारे विजय मिळवला.

सोमवारी भारताची मोहीम पुढे चालू राहील, ज्यामध्ये 23 वर्षांखालील गटातील चार पुरुष बॉक्सर रिंगमध्ये उतरतील. आशियाई चॅम्पियन विश्वनाथ सुरेश (50 किलो) उझबेकिस्तानच्या अमीरबेक इस्मोइलोव्हविरुद्ध लढतीने दिवसाची सुरुवात करेल. त्यानंतर गंगा (55 किलो) मंगोलियाच्या अमगलनबातार बुलगनखूचा सामना करेल. त्यानंतर सागर जाखर (60 किलो) जपानच्या कोइची नाकायामाशी भिडेल, तर हितेश (70 किलो) चायनीज तैपेईच्या जुन-झांग्लिनविरुद्ध लढून दिवसाची सांगता करेल.

Advertisement

‘बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया‘ने 19 वर्षांखालील आणि 23 वर्षांखालील अशा दोन्ही गटांत एक मजबूत संघ उतरवला असून, प्रत्येक वयोगटात 20 खेळाडू सहभागी होत आहेत. आशियातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत स्वताची क्षमता तपासण्यासाठी ही चॅम्पियनशिप भारतीय बॉक्सर्सच्या पुढील पिढीसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे.

Advertisement
Tags :

.