महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताने बनविले ‘कामिकेज’ ड्रोन

06:46 AM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शक्य तितक्या क्षेत्रांमध्ये तंत्रवैज्ञानिक आत्मनिर्भरता प्राप्त करणे हे ध्येय भारताने निर्धारित केले आहे. विशेषत: संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेची सर्वाधिक आवश्यकता आहे, हे लक्षात घेऊन नवनवी अत्याधुनिक संरक्षण साधने आणि शस्त्रास्त्रे भारतातच उत्पादित करण्याचा प्रयत्न वेगाने करण्यात येत आहे. या प्रयत्नात उत्साहवर्धन यशही मिळत आहे. शत्रूच्या छातीत धडकी भरविणाऱ्या अशाच एका आक्रमणकारी ड्रोनची स्वदेशात निर्मिती करण्यात यश आले आहे.

Advertisement

दुसऱ्या महायुद्धात जपानच्या ‘कामिकेज’ विमानचालकांनी मोठा आत्माहुती देऊन मोठाच पराक्रम गाजविला होता. युद्ध विमानांमध्ये स्फोटके भरुन ती शत्रूच्या लक्ष्यांवर आदळविली जात असत. या हल्ल्यांमध्ये विमानचा चालक ठार होत असे, पण शत्रूचेही प्रचंड नुकसान होत असे. अशाच प्रकारे कार्य करणाऱ्या, पण ज्यात विमानचालकाला प्राण गमविण्याचा प्रश्न उद्भवत नाही, अशा प्रकारच्या ड्रोनची निर्मिती भारताने केली आहे. त्यांनाच ‘कामिकेज’ ड्रोन्स म्हटले जात आहे.

Advertisement

ही ड्रोन्स अर्थातच मानवरहित असतात. ती निर्माण करण्यासाठी खर्च बराच कमी येतो. त्यांचा वेग मोठा असतो आणि दिशा तसेच लक्ष्यवेध अचूक असतो. ही ड्रोन्स आकाशात एका निश्चित उंचीवरुन उडतात. ती 100 ते 200 किलो वजन नेऊ शकतात. 30 ते 40 किलो विस्फोटके त्यांच्यात भरली जाऊ शकतात. ती पूर्वनिर्धारित लक्ष्यांवर आदळविली जाऊ शकतात. आदळल्यानंतर त्यांचा स्फोट होतो आणि शत्रूची मोठी हानी होते. भारताची जीवीतहानी मात्र होत नाही. ही ड्रोन्स नॅशनल एअरोस्पेस लॅबोरॅटरीजने निर्माण केली आहेत. या ड्रोन्सच्या हालचालींवर भूमीवरुन नियंत्रण ठेवता येते. ती लक्ष्यावर आदळण्याची शक्यता नसेल तर त्यांना परतही बोलाविता येऊ शकते. अशा प्रकारे ही ड्रोन्स भारताच्या संरक्षण व्यवस्थेचा आधार ठरु शकतात, असे तज्ञांचे मत आहे. जगात खूपच कमी देशांकडे अशी ड्रोन्स आहेत. अमेरिका आणि युक्रेनकडून अशा ड्रोन्सचा उपयोग केला जातो. चीन, इस्रायल आणि अन्य काही देशांकडेही हे तंत्रज्ञान आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article