For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रो हॉकी लीग : स्पेनविऊद्ध भारताचा शूटआउटमध्ये 3-4 असा पराभव

06:14 AM Feb 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रो हॉकी लीग   स्पेनविऊद्ध भारताचा शूटआउटमध्ये 3 4 असा पराभव
Advertisement

वृत्तसंस्था/ होबार्ट, ऑस्ट्रेलिया

Advertisement

एफआयएच पुऊष प्रो लीग 2025-26 च्या होबार्ट टप्प्यात निर्धारित वेळेत 1-1 अशा चुरसपूर्ण बरोबरीनंतर भारताचा स्पेनविऊद्ध शूटआउटमध्ये 3-4 असा पराभव झाला. मनिंदर सिंगच्या शानदार गोलमुळे 59 व्या मिनिटापर्यंत 1-0 अशी आघाडी मिळूनही भारताला निर्धारित वेळेत बरोबरीवर समाधान मानावे लागले. कारण स्पेनच्या ब्रुनो फोंटने उशिरा गोल करून संघाला बरोबरी साधून दिली.

स्पेनने जोरदार सुऊवात केली, सुऊवातीच्या चेंडूवर नियंत्रण ठेवले आणि भारतीय बचावाची परीक्षा घेतली. त्यांनी चौथ्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला, परंतु ड्रॅग-फ्लिक भारतीय गोलकीपर मोहितने आरामात वाचवला. स्पेनला वाटले की, त्यांनी 8 व्या मिनिटाला आघाडी घेतली आहे, परंतु जोस बास्टेराचा गोल नाकारण्यात आला. दबावाकडे दुर्लक्ष करून भारताने 14 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला, परंतु अमित रोहिदासचा ड्रॅग-फ्लिक स्पॅनिश गोलकीपर लुईस कॅलझाडोने निष्फळ ठरविला आणि पहिले सत्र गोलरहित ठेवले.

Advertisement

भारताला 19 व्या मिनिटाला आघाडी मिळाली. कर्णधार हार्दिक सिंगने एका स्पॅनिश खेळाडूला चकविले, उत्कृष्ट वळण घेतले आणि मनिंदरला चेंडू पुरविला, ज्याने भारताला आघाडी मिळवून दिली. स्पेनने लगेच पेनल्टी कॉर्नर मिळवून प्रत्युत्तर दिले, परंतु पेपे क्युनिलचा फटका सूरज करकेराने अडवला. नंतर करकेराने आणखी एक फटका जबरदस्तरीत्या अडवून बास्टेराला संधी नाकारली. भारताचा अभिषेकही एका शानदार ड्रिबलनंतर गोल करण्याच्या जवळ आला होता, पण त्याचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. मध्यंतरापर्यंत भारताने 1-0 अशी आघाडी कायम ठेवली.

तिसऱ्या सत्रात स्पेनने जोरदार दबाव वाढवला. स्पेनच्या चिकाटीमुळे त्यांना सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, दोन्ही मोहितने कुशलतेने वाचवले. सत्र संपताच फोर्टुनोला हिरवे कार्ड मिळाल्याने स्पेनची संख्या 10 खेळाडूंवर आली. 44 व्या मिनिटाला भारताने जवळपास फायदा उठवला होता, परंतु जुगराज सिंगच्या पेनल्टी कॉर्नर फटक्यावर कॅलझाडोने जोरदार बचाव केला. शेवटच्या सत्रात 45 व्या मिनिटाला संजयला हिरवे कार्ड मिळाल्याने भारतही 10 खेळाडूंवर घसरला. स्पेन बरोबरीसाठी प्रयत्न करत असताना 52 व्या मिनिटाला भारताच्या विष्णुकांत सिंगने पेनल्टी कॉर्नर मिळवला, परंतु रोहिदासने लक्ष्य चुकवले. काही मिनिटांनंतर राजिंदर सिंगचा ड्रॅग-फ्लिक देखील गोल करण्यात अपयशी ठरला. 59 व्या मिनिटाला झालेल्या महागड्या बचावात्मक चुकांमुळे ब्रुनो फोंटने उत्कृष्टरीत्या स्पेनला बरोबरी साधून दिली.

शेवटच्या 13 सेकंदांत स्पेनला सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु भारतीय बचावफळीने 1-1 अशी बरोबरी कायम राखली. त्यानंतरच्या शूटआउटमध्ये अभिषेक आणि हार्दिक सिंग यांचे फटके चुकणे महागात पडले आणि भारत 3-4 असा पराभूत झाला. भारताचा पुढील सामना आज बुधवारी ऑस्ट्रेलियाशी होईल.

Advertisement
Tags :

.