महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इंडिया लिजेंड्स विश्व विजेते

06:45 AM Jul 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाकचा पाच गड्यांनी पराभव

Advertisement

वृत्तसंस्था/ एजबेस्टन

Advertisement

2024 च्या विश्व लिजेंड्स टी-20 चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद भारताने पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच गड्यांनी पराभव केला. भारतीय संघातर्फे अंबाती रायडूने शानदार अर्धशतक झळकाविले.

या सामन्यात भारतीय लिजेंड्स संघाचा कर्णधार युवराज सिंगने नाणेफेक जिंकून पाक लिजेंड्सला प्रथम फलंदाजी दिली. पाक संघाने 20 षटकात 6 बाद 156 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने 19.1 षटकात 5 बाद 159 धावा जमवित हा सामना आणि स्पर्धेचे जेतेपद 5 चेंडू बाकी ठेऊन मिळविले.

पाकच्या डावामध्ये सलामीच्या कमरान अकमलने 19 चेंडूत 4 चौकारांसह 24, शार्जिल खानने 10 चेंडूत 2 चौकारांसह 12, शोएब मक्सूदने 12 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 21, शोएब मलिकने 36 चेंडूत 3 षटकारांसह 41, कर्णधार युनूस खानने 7 धावा जमविल्या. मिसबाह उल हकने 15 चेंडूत 1 चौकारासह 15 धावा जमवित तो निवृत्त झाला. सोहेल तन्विरने 9 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 19 धावा केल्या. पाकच्या डावामध्ये 6 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे अनुरित सिंगने 43 धावांत 3 तर विनयकुमार, पवन नेगी आणि इरफान पठान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावामध्ये अंबाती रायडूने 30 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 50 धावा जमविल्या. गुरुकिरातसिंग मानने 33 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 34, कर्णधार युवराज सिंगने नाबाद 15, रॉबिन उथप्पाने 1 चौकारासह 10, युसूफ पठानने 16 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 30 धावा जमविल्या. इरफान पठान 1 चौकारासह 5 धावांवर नाबाद राहिला. भारताच्या डावामध्ये 6 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे आमिर यामीनने 29 धावांत 2 तर सइद अजमल, वहाब रियाझ आणि शोएब मलिक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : पाक 20 षटकात 6 बाद 156 (कमरान अकमल 24, शोएब मक्सूद 21, शोएब मलिक 41, मिसबाह उल हक निवृत्त 18, सोहेल तन्विर नाबाद 19, शार्जिल खान 12, अवांतर 3, अनुरित सिंग 3-43, विनयकुमार, नेगी, इरफान पठान प्रत्येकी 1 बळी).

भारत 19.1 षटकात 5 बाद 159 (उथप्पा 10, अंबाती रायडू 50, गुरुकिरातसिंग मान 34, रैना 4, युवराज सिंग नाबाद 15, युसूफ पठान 30, इरफान पठान नाबाद 5, अवांतर 11, यामिन 2-29, सइद अजमल, वहाब रियाझ व शोएब मलिक प्रत्येकी 1 बळी).

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article