मोबाईल डेटामध्ये भारताची आघाडी
अमेरिकेला मागे टाकत भारताची सरशी : दूरसंचार विभागाच्या माहितीमधून स्पष्ट
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारत आता डिजिटल क्षेत्रात दररोज एक नवा विक्रम करत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मोबाईल डेटाच्या बाबतीत नवा विक्रम प्राप्त केलेला असून या कामगिरीत अमेरिकेसारख्या बलाढ्या देशांना मागे टाकले आहे, अशी माहिती दूरसंचार विभागाने नुकतीच दिली आहे. यामध्ये दूरसंचार विभागाने म्हटले आहे, की भारतातील सर्वात स्वस्त मोबाईल डेटा लोकांना दिला जात आहे. आज देशात परवडणाऱ्या इंटरनेट सुविधांमुळे भारतातील जवळजवळ प्रत्येक नागरिकाकडे मोबाईल फोन आहे. यामुळे दिवसागणिक मोबाईल व त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या इंटरनेटचा वापर हा वाढतानाच दिसत आहे.
भारतात स्वस्त इंटरनेट सेवा
दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मोबाईल संभाषणामध्ये मोठा बदल झालेला दिसून येत आहे. कारण ऑक्टोबर 2024 पर्यंत देशात 1.15 अब्ज मोबाईल ग्राहक होते. त्यापैकी अंदाजे 1.06 अब्ज सक्रिय होते, तर जून 2024 पर्यंत 128 दशलक्ष वायरलेस इंटरनेट ग्राहक इतके कमी झाले आहेत. आणि मोबाईल डेटाच्या किमती प्रति जीबी 9.08 रुपये झाल्या आहेत. जे जगातील सर्वात कमी दरांपैकी एक आहेत.
मासिक डेटा वापर प्रति स्मार्टफोन सर्वाधिक
दूरसंचार विभागाने असेही निरीक्षण नेंदवले आहे की, भारताने प्रति स्मार्टफोन सरासरी मासिक डेटा वापरात जागतिक आघाडी घेतली आहे. जागतिक सरासरी 19 जीबीच्या तुलनेत दरमहा सरासरी 32 जीबी डेटा वापरला जातो. तसेच येत्या काळात या परिस्थितीत आणखी सुधारणा होणार असल्याचा अंदाजही दूरसंचार विभागाने व्यक्त केला आहे.