महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंडिया ड ला 311 धावांची आघाडी

06:40 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / अनंतपूर

Advertisement

2024 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर इंडिया ड ने इंडिया ब वर 311 धावांची मजबूत आघाडी मिळविली आहे. रिकी भुई आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके झळकविली.

Advertisement

या  सामन्यात इंडिया ड ने पहिल्या डावात 349 धावा जमविल्यानंतर इंडिया ब चा पहिला डाव 282 धावांत आटोपला. इंडिया ड ने 67 धावांची आघाडी मिळविली. इंडिया ड ने दिवसअखेर दुसऱ्या डावात 44 षटकात 5 बाद 244 धावा जमविल्या. या सामन्यात पहिल्या डावात शतक झळकविणारा रिकी भुई 90 धावांवर खेळत आहे.

इंडिया ब ने 6 बाद 210 या धावसंख्येवरुन शनिवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा पहिला डाव 76.2 षटकात 282 धावांवर आटोपला. इंडिया ब च्या शेवटच्या चार गड्यांनी 72 धावांची भर घातली. वॉशिंग्टनसुंदरने 140 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 87 धावा झळकविल्या. तर ईश्वरनने 116 धावांची शतकी खेळी केली. इंडिया ड तर्फे सौरभकुमारने 73 धावांत 5 तर अर्शदीप सिंगने 50 धावांत 3 गडी बाद केले.

इंडिया ड ने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. दरम्यान फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत असलेल्या श्रेयश अय्यरने 40 चेंडूत 50 धावा जमविल्या. इंडिया ड च्या दुसऱ्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. त्यांची एकवेळ स्थिती 3 बाद 18 अशी केविलवाणी झाली होती. दरम्यान अय्यर आणि भुई यांनी 10.3 षटकात चौथ्या गड्यासाठी 75 धावांची भागिदारी केली. मुकेशकुमारने अय्यरला झेलबाद केले. मुकेशकुमारने 80 धावांत 3 गडी बाद केले असून नवदीप सैनीने 40 धावांत 2 बळी मिळविले. पहिल्या डावात शतक झळकविणाऱ्या रिकी भुईने संजू सॅमसनसमवेत पाचव्या गड्यासाठी 68 धावांची भागिदारी केली. सॅमसनने 53 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 45 धावा जमविल्या. भुई 87 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारासह 90 तर आकाशसेन गुप्ता 28 धावांवर खेळत असून या जोडीने सहाव्या गड्यासाठी अभेद्य 83 धावांची भागिदारी केली आहे. या सामन्यातील रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी इंडिया ड चा संघ एकतास खेळून इंडिया ब ला विजयासाठी 75 षटकात 375 धावांचे आव्हान देईल, असा अंदाज आहे.

संक्षिप्त धावफलक: इंडिया ड प. डाव 349, इंडिया ब प. डाव 76.2 षटकात सर्वबाद 282 (ईश्वरन 116, वॉशिंग्टन सुंदर 87, सौरभ कुमार 5-73, अर्शदीप सिंग 3-50), इंडिया ड दु. डाव 44 षटकात 5 बाद 244 (भुई खेळत आहे 90, अय्यर 50, सॅमसन 45, सेन गुप्ता खेळत आहे 28, मुकेशकुमार 3-80, नवदीप सैनी 2-40)

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article