कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत जगातील सर्वात मोठे क्विक मार्केट

06:19 AM Nov 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चीन-अमेरिकेपेक्षा दुप्पट वेगाने वाढ : 5 वर्षांत 1 लाख कोटींची बाजारपेठ होणार

Advertisement

नवी दिल्ली : 

Advertisement

एका अहवालानुसार, क्विक कॉमर्सच्या एकूण व्यवसायापैकी 70 टक्के व्यवसाय आता फक्त किराणा मालातून होतो आहे. यामध्ये चीन आणि अमेरिकेनंतर, भारत जगातील तिसरी सर्वात मोठी जलद वाणिज्य बाजारपेठ झाली आहे. 2024 मध्ये 5.6 अब्ज डॉलर्स (सुमारे 50 हजार कोटी) चा व्यवसाय होता आणि 2030 पर्यंत तो दुप्पट होऊन 11 अब्ज डॉलर्स (सुमारे 1 लाख कोटी) पर्यंत पोहोचू शकतो.

विशेष म्हणजे भारत हा टॉप-3 देशांमध्ये सर्वात वेगाने वाढणारा देश आहे. 2025-2030 दरम्यान भारताच्या जलद वाणिज्यचा विकास दर 15.5 टक्के असण्याचा अंदाज आहे. त्याच वेळी, अमेरिका 6.72 टक्के आणि चीन 7.9टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये, जगभरातील क्विक कॉमर्स कंपन्यांना एकूण 2.8 अब्ज डॉलर्स (सुमारे 25 हजार कोटी) निधी मिळाला, त्यापैकी 37 टक्के किंवा एक तृतीयांश वाटा भारतीय कंपन्यांना मिळाला. झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी इन्स्टामार्ट सारख्या कंपन्या गुंतवणूकदारांची पहिली पसंती बनल्या आहेत. 2021 पासून या क्षेत्रात 5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त (सुमारे 45,000 कोटी) गुंतवणूक झाली आहे.

क्विक कॉमर्स म्हणजे?

क्विक कॉमर्स म्हणजे 10 ते 30 मिनिटांत तुमच्या घरी वस्तू पोहोचवणे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या सामान्य ई-कॉमर्समध्ये ऑर्डर दिल्यानंतर 1-2 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागतो, परंतु क्विक कॉमर्समध्ये डिलिव्हरी खूप जलद होते.    रेडशीअरच्या अहवालानुसार, 2030 पर्यंत वापरकर्त्यांची संख्या 23.3 कोटींपर्यंत वाढू शकते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article