कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बंगाल उपसागर क्षेत्रात भारतच सर्वात मोठा देश

07:00 AM Apr 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी मोहम्मद युनूस यांना शिकविला भूगोलाचा पाठ

Advertisement

वृत्तसंस्था/बँकाँक

Advertisement

भारताला बंगालच्या उपसागरात बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य पुढाकार म्हणजेच बिम्सटेकमध्ये स्वत:च्या जबाबदारीची जाणीव आहे आणि आम्ही आर्थिक आणि भू-राजकीय हालचालींबद्दल जाणून आहोत. क्षेत्रीय सहकार्य एक एकीकृत दृष्टीकोन असून तो निवडक विषयांवर आधारित नसल्याचे भारताचे मानणे आहे. बंगालच्या उपसागरात सर्वात मोठा किनारा भारताला लाभला असल्याचे म्हणत विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान मोहम्मद युनूस यांना भूगोलाचा पाठ शिकविला आहे. मोहम्मद युनूस यांनी स्वत:च्या चीन दौऱ्यादरम्यान भारताच्या ईशान्येतील 7 राज्ये भूवेष्टित असल्याने बंगालचा उपसागर आणि त्याला लागून असलेल्या हिंदी महासागराचा बांगलादेश एकटा संरक्षक असल्याचे वक्तव्य केले होते. युनूस यांनी अलिकडेच चीनच्या सरकारला स्वत:च्या देशात एक आर्थिक आधार स्थापन करण्याचा आग्रह केला होता.

थायलंडमध्ये 6 वे बिम्सटेक शिखर संमेलन

थायलंडमध्ये 6व्या बिम्सटेक शिखर संमेलनाला जयशंकर यांनी संबोधित केले. बंगालच्या उपसागराच्या आसपास आणि समीपवर्ती देशांचे संयुक्त हितसंबंध आणि संयुक्त चिंता आहेत. यातील काही आमच्या इतिहासातून निघाल्या आहेत, ज्याला अन्य प्राथमिकता आणि क्षेत्राच्या कल्याणासाठी मागे सोडण्यात आले आहे. भारताला स्वत:च्या सीमा, प्राथमिकता आणि जबाबदारी माहिती आहे. बंगालच्या उपसागरात 6500 किलोमीटरचा किनारा भारताला लाभला आहे. या क्षेत्रात  बिम्सटेकच्या 5 सदस्यांसोबत सीमा लागून असण्यासोबत भारत त्यांच्यासोबत उत्तम संपर्क देखील ठेवून आहे. भारतीय उपखंड आणि आसियान देशांदरम्यान देखील अत्यंत अधिक इंटरफेस प्रदान करत असल्याचे जयशंकर म्हणाले.

ईशान्य बिम्सटेकसाठी कनेक्टिव्हिटी हब

आमचे ईशान्य क्षेत्र विशेषकरून बिम्सटेकसाठी एक कनेक्टिव्हिटी हबच्या स्वरुपात उदयास येत आहे. ज्यात रस्ते, रेल्वे, जलमार्ग, ग्रिड आणि पाइपलाइन्सचे असंख्य नेटवर्क आहे. याचबरोबर त्रिपक्षीय महामार्ग पूर्ण झाल्यास भारताच्या ईशान्य भागाला प्रशांत महासागरापर्यंत जोडले जाणार आहे, ही कामगिरी प्रत्यक्षात गेमचेंजर ठरणार आहे. एका क्षेत्र विशेषवर केंद्रीत दृष्टीकोनाला ‘चेरी-पिकिंग’ म्हटले जावे. अशा दृष्टीकोनाऐवजी क्षेत्रीय सहकार्यावर अधिक व्यापक आणि समावेशक दृष्टीकोन अवलंबिला जाण्याची गरज असल्याचे जयशंकर म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article